ताज्या घडामोडी

येवला तालुक्यातील पूर्व भागात पाऊसाची जोरदार हजेरी

येवला तालुक्यातील पूर्व भागात पाऊसाची जोरदार हजेरी

वादळी वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह पावसाने अक्षरशः काही गावांना झोडपून काढल… येवला : येवला तालुक्यातील पूर्व भागात दुपारच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील

अंगुलगाव, कोळम व इतर ही गावांना देखील पाऊसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळीवारा आणि मेघगर्जनेसह पावसाने अक्षरश: काही गावांना झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी, नागरिकांची तारांबळ उडाली असून शेतात काढून ठेवलेल्या कांदा झाकण्याकरिता शेतकऱ्याची धावपळ झाली तर उघडयावर असलेला कांदा भिजल्यामुळे झाले नुकसानही झाले आहे. मात्र गेल्या काही दिवसा पासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close