ताज्या घडामोडी

कर्जत मध्ये उभे राहणार प्रशासकीय भवन 14 कोटींची तरतूद

कर्जत मध्ये उभे राहणार प्रशासकीय भवन 14 कोटींची तरतूद

कर्जत : दिपक बोराडे

कर्जत तालुक्यातील शासकीय कार्यालये ही वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने तालुक्यातील ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कर्जत तालुका प्रशासकीय भवन इमारतीला मुहूर्त मिळाला आहे ठाकरे सरकारने या भवनाच्या कामाची निविदा मंजूर केली आहे.14 कोटी रुपये खर्चून कर्जत या तालुक्याचे ठिकाणी पोलीस परेड मैदानाच्या तलाठी कार्यालयाच्या जमिनीवर 2850 चौरस मीटरचे बांधकाम करून तीन मजली इमारत उभी राहत आहे.
कर्जत शहरातील पोलीस मैदान भागातील तहसीलदार निवासस्थान,तेथील तलाठी कार्यालये, मंडळ अधिकारी कार्यालये यांच्या ठिकाणी प्रशासकीय भवन उभारण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने 2014 मध्ये आराखडा तयार केला.त्यावेळी कर्जतचे आमदार राष्ट्रवादीचे सुरेश लाड हे होते,तर राज्यात भाजप-सेना यांच्या युतीचे सरकार सत्तेवर होते.त्यामुळे सुरेश लाड यांचे प्रयत्न तोकडे पडत होते,शेवटच्या वर्षी 2017 मध्ये तत्कालीन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कर्जत प्रशासकीय भवन इमारतीला तांत्रिक मान्यता देत 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.परंतु त्या कामाची निविदा काही सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन वर्षे काढली नव्हती.ठेकेदार कंपनीने ही निविदा 14 कोटी रुपयांना स्वीकारली असून पोलीस मैदानाच्या बाजूला तलाठी कार्यालये असलेल्या जमिनीवर तीन मजली प्रशासकीय भवन आता उभे राहणार आहे.2850 चौरस मीटरचे बांधकाम केले जाणार असून राज्य शासनाची एकूण 12 शासकीय कार्यालये तेथून कामकाज करतील.
27मे रोजी या प्रशासकीय भवन इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडत असून कर्जत मध्ये राजकीय श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागली आहे.सध्या राज्यात असलेले राज्य सरकार हे तीन पक्षांचे असल्याने आजी तसेच माजी आमदार यांच्यासह त्यांचे पक्ष आणि भारतीय जनता पक्ष देखील श्रेय घेण्यासाठी पुढे आहे.मात्र या हे काम कर्जत साठी व्हावे यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे सातत्यपूर्ण योगदान महत्वाचे आहे.मात्र या प्रशासकीय भवनात राज्य सरकारची 12 शासकीय कार्यालये यांचे कामकाज चालणार आहे.मात्र त्यानंतर देखील महावितरण,सार्वजनिक बांधकाम विभाग,वन विभाग,कृषी विभाग,जलसंपदा विभाग,ही कार्यालये यानंतर देखील शहरातील वेगवेगळ्या भागातच राहणार आहे,त्याचे काय?हा प्रश्न असून त्यांना देखील सामावून घेण्याची क्षमता या प्रशासकीय भवनात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close