आरोग्य व शिक्षण

*एक गोड दिवस कोविड योध्यांसोबत*

नवी मुंबई / प्रतिनिधी :-
जे डी

*एक गोड दिवस कोविड योध्यांसोबत*

मनसे नेते अमितसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष ग़ज़ानन काळे साहेब यांच्या मार्गदर्शानाख़ाली NRI पोलिस स्टेशन मधील पोलिसांसाठी रसगुल्याचा तसेच गुलाबजाम १२५ किलो चा बेत केला होता. विद्यार्थी सेना शहर सहसचिव ओंकार दिलीप गंधे, स्थानिक प्रतिनिधी स्वाती भोईर विद्यार्थी सेना उपविभाग अध्यक्ष हितेश बडेकर, शाखा अध्यक्ष भावेश भोईर, उपशाखा अध्यक्ष श्रुतिक पुगावकर, रोहन गंधे, इम्तियाज उस्मानी, हर्षल जाधव यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले होते.

बेलापूर मनसे विभागाच्या पुढाकारामुळे अमितसाहेबांचा वाढदिवस गोड वातावरणात पोलिसांसोबत तसेच सफाई कामगारांसोबत साजरा करता आला.

NRI पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.रवींद्र पाटील साहेब,श्री. सचिन बोठे साहेब व इतर सर्व पोलिस बांधव व महिला कर्मचारी, ट्रॅफिक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.शेलकर साहेब आणि त्यांच्या टीमचे सहकार्याबद्दल आभार मानले..

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close