ताज्या घडामोडी

राष्टीय महामार्ग काळ्याचा झाला लाल आणि वाहन चालकांना हाल….!*

*राष्टीय महामार्ग काळ्याचा झाला लाल आणि वाहन चालकांना हाल….!*

⏺️ *महामार्गचे काम करत आलेल्या ठेकेदार कडून गलिच्छ कारभार*

⏺️ *पहिल्याच पावसात महामार्गची झाली दैना*

राष्टीय महामार्ग क्रमांक 66 ची पहिल्याच पावसात दैना झाली असून सुरु असलेल्या कामामुळे सर्व ठिकाणी मातीच माती पसरली होती तर महामार्ग काळ्याचा लाल झाला असून वाहनचालकांचे हाल झाल्याचे चित्र दिसत आहेत.
महामार्गचे काम सुरु असून कोणत्या ही पद्धतीचे नियोजन नसून कुठून ही खोदून कुठे ही माती टाकली जात आहे. गटारे बुजवली गेली आहेत. पावसाचे पडणारे पाणी जाण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नसल्याने खोदलेली माती पाण्यासहीत महामार्गवर आली असून काळा दिसणारा महामार्ग काहीं दिवस लालच लाल दिसत होता.राष्टीय महामार्गचा ठेका एम.ई. पी. कंपनीने घेतला असून त्याचे सबठेकेदार जे. एम. मात्रे कंपनीही कंपनी असून बेजबाबदार पणे ही कंपनी आरवली ते बावनदी दरम्यान काम करत असल्याची लेखी तक्रार कार्यकरी अभियंता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग रत्नागिरी यांना करून सुद्धा त्याच्या कडे दुर्लक्ष केले जात आहे. पावसाआधीच महामार्गवर येणारे पाणी आणि कंपनी ने केलेल्या दिसाळ कामामुळे महामार्गवर येणाऱ्या मातीचे योग्य ते नियोजन करण्याचे लेखी पत्र ही संबंधित विभागाला देण्यात आले होते मात्र डिम्म असणारे कार्यकारी अभियंता आपली एसी कॅबिनच सोडायला तयार नसल्याचे बोलले जात आहे.
महामार्गवर आलेल्या माती मुळे 2 दिवसात किरकोळ अपघात सुद्धा झाले असून काहींना दुखापत झाली आहे. येणाऱ्या मोठ्या पावसात जर टाकलेल्या मातीळा व्यवस्थित दगड किंवा सिमेंट पिशवीत माती भरून त्याला लावल्या नाहीत तर महामार्ग लाल मातीमय होऊन महामार्ग वर अपघातांची मालिका सूरू होईल. तरी अजून ही संबंधित कंपनी आणी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी यांनी कार्यालयातून रस्त्यावर येऊन पाहणी करावी अशी मागणी होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close