ताज्या घडामोडी

पिगी बँक फोडून 14 वर्षाच्या पार्थकडून कोविड रुग्णांना व्हीलचेअर भेट*

*पिगी बँक फोडून 14 वर्षाच्या पार्थकडून कोविड रुग्णांना व्हीलचेअर भेट*

*श्रमजीवी कोविड सेंटरचे काम सोशल मीडियावर पाहून नववीतला विद्यार्थी मदतीसाठी सरसावला*

सुहास पांचाळ / पालघर

उसगाव डोंगरी येथील श्रमजीवी कोविड केअर सेंटरच्या अभिनव उपक्रमांच्या बातम्या आणि पोस्ट सद्या व्हायरल होताना दिसत आहेत, विविध लोक मदतीचा हात पुढे करत रुग्णांना दिलासा देण्याचे काम करत आहेत. यातच या पोस्ट आपल्या वडिलांच्या मोबाईलवर पाहिल्याने भिवंडी तालुक्यातील 14 वर्ष वयाचा इयता नववीत शिकणारा बालक कु.पार्थ रमाकांत पाटील (रा.पालाखणे) मदतीसाठी पुढे आला. आपल्याकडे असलेल्या गल्ल्यातील (piggy bank) मधून पैसे काढून पार्थ याने साडे सहा हजार किमतीची व्हील चेअर खरेदी करून येथील रुग्णांना भेट दिली.

पार्थचे वडील रमाकांत पाटील हे हॉटेल व्यवसायिक असून त्याचा  भाऊ मयुरेश हा डॉक्टर आहे, त्याची आणि वडिलांची  मदत घेऊन त्याने ठाण्यातील एका विक्रेत्याचा नंबर मिळवला, आणि वडिलांसोबत जाऊन ही व्हील चेअर खरेदी करून प्रत्यक्ष श्रमजीवी कोविड सेंटर येथे येऊन ही चेअर पार्थ ने भेट दिली. यानंतर पार्थ याने लिहिलेले छोटेसे पत्र त्याने ज्यांच्या संकल्पनेतून हे अभिनव कोविड सेंटर सुरू झाले आहे ते श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित यांना भेटून सुपूर्द केले. विवेक भाऊ पंडित यांनी पार्थ चे कौतुक करत त्याने घेतलेल्या या निर्णयाचे मनापासून स्वागत करत इतक्या कमी वयात त्याच्यातील संवेदनशीलतेबद्दल समाधान व्यक्त केले. पंडित यांनी पार्थ याच्या शाळा, अभ्यास याचीही आपुलकीने विचारपूस केली. यावेळी त्याच्यासोबत वडील रमाकांत पाटील, श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार, लक्ष्मण पडवले, प्रा.दिनेश काटले सर, ममता परेड, महेश धांगडा, रुपेश जाधव, महेश ठाकरे इत्यादी होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close