ताज्या घडामोडी

*मा.जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार आजपासून सांगोला शहरासह तालुक्यात १० दिवस कडक निर्बंध

*मा.जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार आजपासून सांगोला शहरासह तालुक्यात १० दिवस कडक

 

निर्बंध


*

———————————————–

*सांगोला/विकास गंगणे*

मा.जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सांगोला शहरात आज १ जून पर्यंत कडक निबंध लागू करण्यात आले आहेत. या १० दिवसाच्या कालावधीत सांगोला शहरात फक्त पुढील गोष्टी सुरू राहतील ;-

● सकाळी ७ ते ११ यावेळेत किराणा दुकाने फक्त घरपोच सेवा साठी सुरू राहतील . किराणा दुकानांवर ग्राहक आढळून आल्यास सदर दुकानावर कडक कारवाई केली जाईल . अशी माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली आहे.

● भाजी , फळे यांची विक्री देखील सकाळी ७ ते ११ या वेळेत फक्त घरपोच सेवा पद्धतीने करायची आहे.यासाठी भाजी,फळ विक्रेते घरोघरी फिरून विक्री करू शकतात . कुठल्याही परिस्थितीत मंडईमध्ये , चौकात , प्रमुख रस्त्यांवर थांबून विक्री करू नये . किराणा , भाजी , फळे यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे अपेक्षित नाही.

● कृषी अवजारे , बी , बियाणे , खते , कीटकनाशके व कृषी सेवा केंद्रे ही सकाळी ७ ते २ यावेळेत सुरू राहतील.सर्व दुकान मालकांनी आपल्या दुकानात गर्दी होणार नाही , सुरक्षित अंतर राखले जाईल यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत. सकाळी ६ ते ९ यावेळेत घरपोच दूध विक्री / रतीब सुरू राहतील.

● मेडिकल , हॉस्पिटल सुरळीतपणे सुरू राहतील.पुढील 10 दिवस शहरात मेडिकल , हॉस्पिटल , कृषी संबंधित सामान या कारणाशिवाय घराबाहेर पडणा-या नागरिकांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणा-या अस्थापनांवर नगरपालिका , पोलीस , महसूल विभागांमार्फत कडक कारवाई केली जाईल व वाहने जप्त केली जातील याची सर्वांनी नोंद घ्यावी.शहरातील नागरिक , व्यापारी यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आजपर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केले आहे.त्या पद्धतीने सहकार्य करुन मा.जिल्हाधिकारी यांच्या निर्देशांचे पालन करावे. असे आवाहन करण्यात येत

 

आहे.

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close