ताज्या घडामोडी

पाटोदा येथे केंद्र सरकारच्या विरोधात टाळ्या व थाळ्या वाजून प्रहारचे आंदोलन

*पाटोदा येथे केंद्र सरकारच्या विरोधात टाळ्या व थाळ्या वाजून प्रहारचे आंदोलन

प्रतिनिधी/ एजाज देशमुख

देशाचा पोशिंदा बळीराजा एक ना अनेक सुलतानी व आसमानी संकटांना तोंड देता देता देशोधडीला लागला असताना या बळीराजा समोर रोज नवे नवे संकट येत आहे. त्यातल्या त्यात गेल्या वर्षभरापासून कोरोना सारख्या अतिशय भयंकर परिस्थितीत देखील हा बळीराजा देशाच्या जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी आपल्याच देशातील जनता म्हणजे माझे कुटुंब समजून स्वतःच्या जिवाची पर्वा न करता मदत करीत होता, अशा परिस्थितीत ह्या बळीराजाला त्याच्या केलेल्या कामाची शाबासकी मिळण्याऐवजी केंद्र सरकारने शेतकऱ्याला लागणाऱ्या रासायनिक खतांच्या किमतीमध्ये तब्बल सातशे रुपये पर्यंत वाढ करून ह्या बळीराजाची कंबरडे मोडण्याची काम चालवले आहे, एवढ्यावरच न थांबता भारतामध्ये तूर डाळीचा मुबलक व पुरेसा साठा असतानादेखील केंद्र सरकारने परदेशातून तुरडाळीची आयात करण्याचे ठरवले, शेतकऱ्यांवर झालेल्या या अन्यायाच्या विरोधात दिल्लीपर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांचे कैवारी नामदार बच्चु भाऊ कडू यांच्या आदेशाने आज संध्याकाळी सहा वाजता राज्यभर प्रहारच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात थाळ्या व टाळ्या वाजवून निषेध नोंदवला
नामदार बच्चु भाऊंचे आदेशाप्रमाणे पाटोदा येथील प्रहार संघटनेकडून देखील आज संध्याकाळी सहा वाजता पाटोदा येथील प्रवेशद्वाराजवळ कोरोना चे सर्व नियम पाळून प्रहार संघटनेने टाळ्या व थाळ्या वाजवून केंद्र सरकारचा निषेध केला यावेळी प्रहारचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री रामभाऊ नाईकवाडे सह शाखाध्यक्ष चेतन बोरणारे, शाखा उपाध्यक्ष श्याम में गाणे, सुनील भाऊ पाचपुते व प्रहारचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी पाटोदा येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील मुजम्मिल चौधरी सह येवला ग्रामीणचे पोलीस श्री मोरे दादा उपस्थित होते, कार्यक्रमाच्या शेवटी रामभाऊ नाईकवाडे यांनी मुजम्मिल चौधरी व मोरेदादा यांचे आभार व्यक्त केले

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close