ताज्या घडामोडी

नाशिक पंचवटी मध्ये हनुमानवाडी येथुन चोरीस गेलेले सीसीटीव्ही कॅमेरे, डी. व्ही. आर, राउटर व मोडेमची चोरी करणाऱ्या इसमास २४ तासात अटक*

*नाशिक पंचवटी मध्ये हनुमानवाडी येथुन चोरीस गेलेले सीसीटीव्ही कॅमेरे, डी. व्ही. आर, राउटर व मोडेमची चोरी करणाऱ्या इसमास २४ तासात अटक*

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

नाशिक –पंचवटी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत जाधव कॉलनीतील सर्व्हे नं. ८६/०१/०१ प्लॉट नं. ०२, हनुमानवाडी, | पंचवटी, नाशिक येथे रेणुका हाईटस या नावाने कन्स्ट्रक्शनचे काम चालु असलेल्या कामाचे ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने बसवलेले ३ सीसीटीव्ही कॅमेरे, १ डीव्हीआर त्यातील हार्डडिस्क सह १ राउटर व १ मॉडेम
असा एकुण ३६,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हा कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याने त्याबाबत पंचवटी पोलीस ठाणे येथे गुरनं. १५३/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीताची तात्काळ माहीती काढून व त्याचा शोध घेवुन अटक करणे बाबत श्री. दीपक पाण्डेय, पोलीस आयुक्त नाशिक शहर, श्री. अमोल तांबे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ- १, श्री. सिताराम गायकवाड, सहा. पोलीस आयुक्त, विभाग १, नाशिक शहर यांनी मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या.

त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक भगत व पोलीस | निरीक्षक (गुन्हे) श्री. अशोक साखरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि / सत्यवान पवार व त्यांचे सोबत असलेले पोलीस पथकाने वरील नमुद गुन्हयातील आरोपीताचा कोणताही ठावठिकाणा नसतांना अतिशय कौशल्यपुर्ण पध्दतीने मानवी व तांत्रिक साधनांचा वापर करून सदर गुन्हयात आरोपी जाधव कॉलनी, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक यास ताब्यात घेवुन त्यास सदर गुन्हयात अटक करून त्याचेकडुन सदर गुन्हयात चोरीस गेलेले ३ सीसीटीव्ही कॅमेरे, १ डीव्हीआर त्यातील हार्डडिस्क सह, १ राउटर व एक मॉडेम असा एकुण ३६,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोहवा/माळोदे करीत आहेत.

• सदरची उल्लेखनिय कामगिरी ही श्री. दीपक पाण्डेय सो, पोलीस आयुक्त नाशिक शहर, श्री. अमोल तांबे पोलीस उप आयुक्त परिमंडळ १, श्री. सिताराम गायकवाड, सहा. पोलीस आयुक्त, विभाग – १, | नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि/ श्री. अशोक भगत, पोनि/ अशोक साखरे, सपोनि/सत्यवान पवार, सपोउनि/ बाळनाथ ठाकरे, पोहवा/माळोदे, पोना/योगेश देवरे, किरण सानप, पोशि/विलास | चारोस्कर, नितीन जगताप यांनी पार पाडली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close