ताज्या घडामोडी

कोरोना लसीकरणातील राजकीय हस्तक्षेप त्वरित थांबवा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

कोरोना लसीकरणातील राजकीय हस्तक्षेप त्वरित थांबवा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

नाशिक – कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेशी राज्यातील आरोग्य यंत्रणा लढत असून विविध सामाजिक संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखे काही निवडक पक्ष ह्या लढ्यात आपल्या संपूर्ण ताकदीने आरोग्य यंत्रणेच्या पाठीशी आहेत. मात्र काही राजकीय पक्षातील लोक प्रतिनिधी व त्यांचे पाठीराखे आपल्या जवळच्या लोकांच्या हितासाठी कोरोना लसीकरणात हस्तक्षेप करीत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. ह्या धक्कादायक प्रकाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध व्यक्त करून आरोग्य यंत्रणेने कुठल्याही राजकीय हस्तक्षेपास न जुमानता सर्व सामान्य जनतेच्या आरोग्याच्या रक्षणाकरीता आपले कर्तव्य बजवावे तसेच प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करून कोरोना लसीकरणातील राजकीय हस्तक्षेप त्वरित थांबवावा असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी नाशिक महानगर पालिकेचे मा. आयुक्त मा. कैलास जाधव साहेब यांना दिले आहे.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या प्रचंड लाटेच्या संसर्गामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड मोठा त्राण पडला आहे. या परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापकीय अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक जागोजागी रुग्ण सेवेत दिवस रात्र आपल्या जीवाचे रान करून एक एक जीवन वाचविण्यासाठी धडपडत आहे. त्याही परिस्थितीत आजपर्यंत कोरोनाशी सुरु असलेल्या ह्या लढ्यापासून नामानिराळे राहिलेले काही तथाकथित राजकीय पुढारी व त्यांचे पाठीराखे आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आपल्या ओळखी पाळखीच्या लोकांना लस मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर दबाव आणीत आहे. भारतीय जैन संघटना सारख्या काही निवडक सामाजिक संघटना आपले उत्तरदायित्व समजून लसीकरण केंद्रांवर आपल्या कार्यकर्त्यांसह सेवा बजावीत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी विविध लसीकरण केंद्रांवर चहा, पाणी, अल्पोपहाराची विनामूल्य सेवा बजावीत आहेत. मात्र काही राजकीय पुढारी व त्यांचे पाठीराख्यांमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा त्राण पडत आहे व सर्व सामान्य जनता लसीकरणापासून वंचित राहत आहे. ह्या धक्कादायक प्रकाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात येऊन आरोग्य यंत्रणेने कुठल्याही राजकीय हस्तक्षेपास न जुमानता आपले कर्तव्य बजवावे तसेच प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करून कोरोना लसीकरणातील राजकीय हस्तक्षेप त्वरित थांबवावा असे आवाहन मा. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close