ताज्या घडामोडी

*एमएसईबीला त्यांचं दुकान नीट चालवता येत नसेल तर बंद करा नाहक नागरीकांचा होणारा खेळखंडोबा थांबवा अन्यथा त्रीव आंदोलन छेडणार:- धर्मेंद्र मोरे, अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी

*एमएसईबीला त्यांचं दुकान नीट चालवता येत नसेल तर बंद करा नाहक नागरीकांचा होणारा खेळखंडोबा थांबवा अन्यथा त्रीव आंदोलन छेडणार:- धर्मेंद्र मोरे, अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी*

कर्जत : विजय डेरवणकर

आज वंचित बहुजन आघाडी, तालुका शाखा कर्ज त च्या वतीने निवेदन देण्यात आले की, हवामान खात्याने चक्रीवादळ येणेबाबतचा अंदाज अगोदरचं सांगितला होता. त्यानुसार सरकारने MSEB ला तयारीत राहण्यास सांगितले होते. परंतु एमएस्ईबी अधिकारी नेहमीप्रमाणे सुस्तावलेले राहुन कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली नाही. त्यामुळे कर्जत तालुका 2 दिवस पुर्ण अंधारात राहीला. एकीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण, उष्णता, विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परिक्षा, घरुन काम करणारे(WORK FROM HOME) आदी सर्वावर खुप परिणाम होऊन नागरीकांना खुप मानसिक त्रास सहन करावा लागला.
लाॅकडाऊन मध्ये सुद्धा महावितरणने विजबिले माफ केली नाहीत. ज्यांनी बिलं भरली नाहीत त्यांचे कनेक्शन कट करण्यात आले. ऐन लाॅकडाऊन मध्ये सुद्धा महावितरणने विजबिलवाढ केली. असं असताना त्या पद्धतीने सर्व्हीस महावितरण देत नाही. हा एक प्रकारे नागरिकांवर अन्याय आहे. तालुक्यातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करुन सुद्धा पडायला आलेले पोल, तसेच अडचणीतले कनेक्शन यासंदर्भात महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वेळीचं लक्ष देत नाहीत. त्यामुळे आता सारखी गंभीर परिस्थिती तयार होते.
अनेक कोरोना रुग्ण हॉस्पीटल, घरी उपचार घेत आहेत, तसेच काही बरे झालेले रुग्ण त्यांना सुद्धा ऑक्सिजन व मेडीकल उपकरणांची गरज लागते तसेच विद्यार्थ्यांचा आभ्यास व परिक्षा ऑनलाईन सुरु आहेत. अनेक नागरीक घरुनचं काम करतात त्यांना इंटरनेट व काम करणेसाठी विजेची गरज आहे. तसेच व्यवसायिक दृष्ट्या सुद्धा विज नसल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे.
तरी याव्दारे आम्ही आपणास निवेदन देतो की, काही दिवसात पाऊस सुरू होईल तसेच अशा प्रकारचे वादळे येत राहतील तरी आपण तशी परिस्थिती येणेची वाट पाहण्यापेक्षा आतापासूनच तालुक्यातील सर्व गंजलेले पोल, नादुरुस्त पोल, तसेच इतर कनेक्शन अशी सर्व कामे त्वरीत पुर्ण करावीत. पुन्हा जर नागरीकांना अंधारात रहावं लागले, कुठल्या रुग्णाचा जीव गेला, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, व्यापारी यांच्या नुकसानास आपण सर्वस्वी जबाबदार रहाल. तुम्हाला तुमचं दुकान चालवता येत नसेल तर बंद करा अन्यथा पक्षाच्या वतीने सुद्धा तुमच्याविरूद्ध त्रीव आंदोलन छेडण्यात येईल याची स्पष्ट नोंद घ्यावी असा इशारा एमएसईबी अधिकारी यांना देवुन श्री प्रकाश देवके कर्जत उपअभियंता यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे,शहर अध्यक्ष लोकेश यादव,विद्यार्ती संघटनेचे अमित गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close