आरोग्य व शिक्षणक्राईम

रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या टोळी कडुन पुन्हा २० रेमडीसीवीर इंजेक्शन जप्त करण्यात आडगांव पोलीसांना यश*

*रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या टोळी कडुन पुन्हा २० रेमडीसीवीर इंजेक्शन जप्त करण्यात आडगांव पोलीसांना यश*

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

नाशिक – दिनांक १४/०५/२०२१ रोजी श्री सुरेश देशमुख, औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन यांचे फिर्यादी वरून आडगांव पोलीस ठाणेस दाखल गुरनं. ७४ / २०२१ भा दं.वि. कलम ४२० सह औषध नियंत्रण किंमत आदेश २०१३ चे परिशिष्ठ २६, अत्यावश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३ (२) (c) व शिक्षा कलम ७, औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ चे कलम १८ (c) शिक्षा कलम (बी) (ii) प्रमाणे दाखल गुन्हयाच्या तपासात रेमडीसीवीर इंजेक्शन पुरवठा करणा-या टोळीस आडगाव पोलीसांकडुन विरार तसेच वाडा जि. पालघर येथुन पुन्हा ४ संशयीतांना ताब्यात घेवुन मा. न्यायालयासमोर हजर केले असता गुन्हयातील ८ ही आरोपींना दिनांक १९/०५/२०२१ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे. अटक आरोपींकडुन काळयाबाजारात विक्रीस असलेले एकुण ६१,०००/- रूपये किंमतीचे २० रेमडीसीवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. गुन्हयातील आरोपीतांची संख्या ही ८ पर्यंत गेली आहे गुन्हयाचा तपास चालु आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री दीपक पाण्डे सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ श्री. अमोल तांबे सो सपोआ/ विभाग १ श्री. गायकवाड सो. यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरिक्षक, श्री. इरफान शेख आडगाव पोलीस स्टेशन, यांचे आदेशान्वये सपोनि / श्री. हेमंत तोडकर, पोउनि राजेंद्र कपले, पोहवा सुरेश नरवडे, भास्कर वाढवणे, विजयकुमार सुर्यवंशी, दशरथ पागी, पोकॉ. सचिन बाहिकर, वैभव परदेशी, विश्वास साबळे देवानंद मोरे, अशांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोउनि/ श्री. राजेंद्र कपले हे करीत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close