ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी समाधान जेजुरकर

*राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी समाधान जेजुरकर*

*ओबीसी सेलच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षवाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू – समाधान जेजुरकर*

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

*नाशिक, दि. १७ मे :-* राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी समाधान जेजुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांचे पत्र समाधान जेजुरकर यांना प्राप्त झाले. हे नियुक्तीचे पत्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या हस्ते समाधान जेजुरकर यांनी स्वीकारले.

सर्व सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ओबीसी सेलच्या माध्यमातून पक्ष विस्तारासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू व ओबीसींच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी आपण अहोरात्र परिश्रम घेऊ असे समाधान जेजुरकर यांनी आपल्या निवडी नंतर बोलतांना सांगितले.

यावेळी त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ साहेब, माजी खासदार समीर भुजबळ, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्यासह पक्षातील सर्व नेत्यांचे आभार मानले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, अमर वझरे, हर्षल खैरनार आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close