ताज्या घडामोडी

शिक्षक श्री माधव पिंगळे   [ शिक्षक ] असे पर्यावरण प्रेमी नाही…!

 लेख – शिक्षक श्री माधव पिंगळे   [ शिक्षक ]
असे पर्यावरण प्रेमी नाही…!

शिक्षण माणसाला समाजाचे वास्तववादि दर्शन घडते. परिस्थितीची जाणीव करून देते हेच शिक्षण विषेशकरून प्रतिकूल परिस्थितून असंख्य ठेचा खात आपले शिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना राष्ट्राविषयी आत्मीयता वाटते. त्यांच्या नेतृत्वातुन विकासात्मक वृत्ती जन्माला येत. अशीच एक व्यक्ती शिक्षण असेल तर असंख्य विद्यार्थ्यांचे ते भाग्यच असेच शिक्षकी पेशातील उत्साही व्यक्तिमत्व म्हणजे येवला तालुक्यातील जिल्हापरिषद शिक्षक म्हणून कार्यरत असलेले माधव पिंगळे.
खरतर हे युवा व्यक्तिगत म्हणजे विद्या विनयेन शोभते याचे उत्तम उदाहरण शिक्षक माधव पिंगळे, नेहमीच समाजपयोगी व विद्यार्थी उपयोगी उपक्रमांत अग्रेसर असतात. से म्हणतात कि धडपड्या माणसाला एखादी गोष्टीची प्रेरणा मिळाली कि तो स्वस्थ बसत नाही वडिलांचं वृक्ष प्रेम आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने त्यांची प्रेरणा जोपासत सरांनी आपला वारसा कायम ठेवला.
१९९६ मध्ये सरांची बदली नांदूर येथील प्राथमिक शाळेत झाली. गाव तसे एकदम छोटे. सरांना कलेचा आणि आपला पर्यावरणाचा अतिशय छंद असल्याने या छोट्याच्या गावात सरांनी शाळेतील प्रत्येक भिंतीवर सुंदर विचार रेखाटले, ते सुविचार वाचून तरी मुलगा आणि गावातील व्यक्ती सुधारतील असे या मागचे उद्देश होता कि काय माहिती नाही.वडील वृक्ष प्रेमी होते.१९७२ मध्ये दुष्काळ असताना रोजगार हमीची काम करून १४ आंब्याची झाडे जागवली वमोठे केले.ती झाडे फळे द्यायला लागली .पण भाऊबंदकीच्या वादात ती सर्व झाडे कापली गेली या गोष्टीचे वडिलांना व मला खूप वाईट वाटले.तेव्हा पासून झाडं बद्दल आकर्षण वाढले.वडिलांचे हे विचार सतत आठवत असतात.त्याच प्रेरणेतून वडिलांनी ३० वर्ष पूर्वी गावठी आंब्यावर केशर हापूस कलाम बांधून घेतले आजतागायत दरवर्षी आंबे अनेक आठवणी जाग्या करतात त्यातून पुन्हा प्रेरणा मिळते. वडिलांनी केशर हापूस ह्या वृक्षाचे संगोपन केले. आज तेच वृक्ष तब्ब्ल ३० वर्ष उलटूनही दिमाखात बहरते आहे. तीच प्रेरणा घेत सरांनी नांदूर जिल्हा परिषदेत झाडे लावले त्यावेळी अनेक व्यक्तींनी सरांचे मन खच्ची करण्याचे काम केले परंतु सरांनी खचून न जात किंवा आपले विचार न बदलता आपले कार्य सुरूच शाळेत सरानी स्वतः झाडांचे खड्डे खोदून मुलांना सोबतीला घेऊन झाले. झाडांच्या बाजूने १८ इंच एवढे उंचीचे चौकोनी कुंड बांधली या कुंडांचा उपयोग करून परिसरात पडणाऱ्या पानांचा कंपोष्ट खत निर्मिती मुलांना पटवून  दिली.झाडांची पानगळ जाळायची नाही असा पर्यावरणीय संदेश दिला.
म्हणून झाडांची पानगळ होत असते आणि कडुनिंबाची निंबोळी हि खाली पडत असायच्या म्हणून त्या गोळा करून झाडांच्या त्या कुंडीत टाकल्याने झाडांना गारवा हि होयच आणि कॅम्पोझ खात देखील तयार होयचे.झाडाना पाणी घालण्यासाठी प्रत्येक वर्गातील मुलांची साखळी पद्धत ठरलेली असायची. असेच एकेदिवशी सरानी एका विद्यार्थ्याला शिक्षा केली म्हणून रागात त्या विद्यार्थ्याने चांगले लखलेले झाड उपटून खाढले, त्यावरती सरानी थांबले नाही तर पुन्हा त्याच ठिकाणी नव्या जिद्दीने अशोकाची झाडे लावली आज त्या झाडांना सुमारे २२ आर्ष उलटून गेली. तरीही ते झाडे आज दिमाखात उभेत आहे. त्यानंतर सरांच्या विचाराशी विचार जोडणारी व्यक्ती म्हणून सोनवणे सर भेटले. त्यांना देखील पर्यावरणाचा खूप छंद असल्याने त्यांनी शाळेतचबोगणवेल रोपवाटिका तयार करून शालेय परिसर विविध फुलझाडांची लागवड करून सुंदर केला .रोप करून वेगवेगळी फुलांची रोपे तयार केली. आजही ह्या सगळ्या गोष्टींची साक्ष नांदूर शाळेत पाहायला मिळते.

२०११ मध्ये सरांची बदली  झाली तेव्हा त्यांनी पुन्हा ज्या शाळेत ज्या शाळेत आपली बदली झाली तिथे देखील आपले कार्य आणि छंद जोपासला. याछंदाच्या माध्यमातून मुलांनाही वृक्ष रोपणाची गोडी लावली.आता पर्यंत विदयार्थ्यांना    परस बाग तयार करण्या विषयी मार्गदर्शन केले.परस बागेत आंबा ,पेरू, जांभूळ,आवळा,लिंबू,चिंच तसेच विविध प्रकारची फुलझाडे पारिजातक,जास्वंदी,गवती चहा, मोगरा जाईजुई,शा विविध झाडांची लागवड करण्यासाठी प्रयत्न करून,प्रत्येक कुटुंबासाठी एक पारिजातक रोप स्वतः घरी तयार करून मुलांना भेट दिले.मुलांनी स्वतःची छोटी रोप वाटिका तयार करून आपल्या शेजारी,मित्रा आणि नातेवाईकांना रोप भेट देण्याची संकल्पना राबवली.त्यामुळे मुलांमध्ये जिव्हाळा निर्माण होऊन,पर्यावरणाचे आपणही काही देने लागतो हा विचार रुजवण्यास मदत झाली.मुलांना रोप कुठून आमचे कधी लावायचे याचे मार्गदर्शन केल्याने ,मुलं पालकांच्या मदतीने झाडे घ्यायला लागली .फुलांच्या विविध कलम पुरवली. २०१४ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले परंतु सरांनी दुःखात  खचून न जात कुटुंबाचा आधार झाले. आणि वडिलांनी ७२ च्या दुष्काळात १४ झाडांचे संगोप केले. दुष्काळ असल्याने पाण्याची भीषण त्यांची त्यात झाडं त्यांनी डोक्यवरतुन पाणी आणून झाडे जगवले. हीच प्रेरणा डोळ्यासमोर ठेवत आजही कार्य सुरूच आहे. वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी गावाच्या वेशीबाहेर पाहिले वडाचे झाड प्रथम वर्षश्रध्दाच्या दिवशी लावले.स्वतःच्या गावातली प्राथमिक शाळा (बल्हेगाव)बकुळ वाद पिंपलचिंच  झाडे लावले व त्यांची काळजी ते आजही घेत आहेगावच्या स्मशान भूमीत लोकांना बसायला सावली असावी म्हणून वड आणि पिंपळरोपे तयार करून संरक्षक जाळ्या स्वतः लावल्या या कामात गावातील तरुण पर्यावरणप्रेमी मदतीला धावून येतात.त्यांचा एक ध्यास  आहे माझं गाव पहिल्यांदा हिरवेगार झाले पाहिजे.गावातील मोक्याची जागी वड पिंपळ झाडे लावून देखरेख शेजारी लोकांना सांगून लक्ष ठेवतात.पर्यावरणाच्या दृष्टीने वाद पिंपळ ही झाडे महत्वाची असल्याने,निसर्गातील अनेक पक्षांची अन्न आणि निवासाची सोय होते.आणि ज्या परिसरात पक्षांची विविधता अधिक तेथील शेतीला त्याचा अधिक फायदा होतो.हेही बाळ मनावर रुजवायला विसरत नाही.
दरवर्षी सीताफळ,बेल,चिंच,इलायतीचिंचअसे विविध बियांचे संकलन करून दरवर्षी बीज रोपण कार्यक्रम राबवतात पावसाळ्या रस्त्याच्या कडेने कडुनिंब बिया टाकतात.याचा पहिला प्रयोग 2006 साली नागडे ब ल्हे गाव रस्त्याने केला .या रस्त्याच्या दुतर्फा कडुनिंब बहरल्याचे पहावयास मिळते .वृक्ष लागवड करण्याची आवड असल्याने त्यांच्या घरी एक छोटीशी नर्सरीत विविध रोप तयार करून पावसाळ्यात लावतात.प्रसंगी मित्र नातेवाईक याना रोप भेट दिली जातात.रोपाच्या निमित्ताने आपली आठवण घराघरात पोहचते.. आज त्यांच्या घरी विविध प्रकारच्या झाडांचे रोप तयार होऊन पावसाच्या प्रतीक्षेत आहे.परिसरात बकुळ झाड दुर्मिळ आहे .तेव्हा कोपरगाव येथील जनार्धन स्वामी मंदिरातून बकुळ बिया आणून 25 रोप तयार केली .ही झाडे परिसरात साक्ष देतात।आज पर्यंत ते ज्याज्या शाळेत गेले त्या ठिकाणी झाडांच्या रूपाने आठवणी ठेवल्या.विद्यार्थ्यांमध्ये हवा ,पाणी ,वीज आणि प्लास्टिक  या बाबत जाणीव जागृती करतात.सध्या शहरात राहत असले तरी छोटीशी बाग तयार करून जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष वेधले जाते.घरातला ओला कचरा घरीच कंपोष्ट करून वापरतात.याकामी घरचे सदस्य देखील मदत करतात पण कधी कधी ट्रगही केल्याचे सांगतात.
२०२० मध्ये १९० पेक्षा अधिक सागाची रोपे तयार करून मुलाना वाटले  आजही ते झाडेबहुतांश मुलांच्या घरी दिमाखात डोलते आहे.
आजही आपल्या गावात (बल्हेगाव) आपल्या शेतीच्या बांधावर 30 सागाची झाडे 20 वर्ष पेक्षा जास्त वयाची आहे .गावात पहिल्यांदा साग लावल्याचा आनंद वाटतो.तसेच गावात विविध ठिकाणी झाडे लावले आहे. आज सर जरी शहरात राहत असले तरी मातीसोबत असलेली नाळ एकदम घट्ट आहे. आपल्या राहत्या घरी सरांनी विविध रोप तयार केले आहे. मागील वर्षी पासून लॉक डाऊन असल्याने फावल्या वेळेचा चांगला सदुपयोग करून यूट्यूब वर बघून विविध कलम करण्याची कला आत्मसात केली. सरांनी आपल्या घरी भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किमान एक रोप देत असतात मग ते कोणतीही व्यक्ती असो. सरानी बहुतांश शाळेंना भेटी दिल्या आहे तिथे तिथे सरानी आपल्या  घरी तयार केले रोप त्यांना भेट स्वरूपात दिली आहे.
सर सांगतात माझ्याकडे विविध व्यक्तींनी विकत झाडे मागितली परंतु मी त्यांना तुम्हाला रोप देऊ शकत नाही म्हणून नाकारले त्यावेळी त्यांनी कारण देखील खूप सुंदर सांगितले. तर ते म्हणाले मी झाडे (रोप)विकण्यासाठी नाही रोप तयार केले तर ते पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी बनवले आहे. हे रोप मी शाळेत लावण्यासाठी तयार केलंय म्हणून मी देऊ शकत नाही.दरवर्षी येणाऱ्या पावसाळ्यात लावण्यासाठी रोपांची आधीच तजवीज केलेली असते.त्यासाठी वर्षभर काम चालू असते.त्याचा त्यांना कंटाळा येत नाही.येत जाता सर्व झाडांवर नजर टाकल्याशिवाय पाय हलत नाही.त्यांचं एकच म्हणणं आहे तुमच्या हयातीत निसर्गात आपल्या आठवणी सोडून जा .प्रत्येकाने असा खारीचा वाटा उचलावा निसर्ग समृद्ध करावा.आज खऱ्या अर्थाने ऑक्सिजन विकत घेताना किती पैसे मोजतोय याची जाणीव होतेय.
असेच जर प्रत्येक व्यक्तीने पर्यावरणाचे वेड लावून घेतलं तर नक्कीच एकदिवस संपूर्ण देश हा स्वच्छ आणि पोषक वातावरणाचा बनेल यात शंका नाही.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close