ताज्या घडामोडी

कोरोना महामारीत मदतीसाठी सरसावले शिक्षक परिषदेचे पदाधिकारी
# शिक्षक परिषदेकडून सामाजिक उपक्रमांतर्गत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केद्रांना केले साहित्याचे वाटप

कर्जत: दिपक बोराडे

मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जगभरात कोरानाने हाहाकार माजवला आहे.त्यातच कर्जत तालुका मुंबई चे जवळ असल्याने कर्जत तालुक्यात कोराना रुग्ण सापडण्याचे प्रमाण जास्त आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा कोरोना महामारी संपुष्टात यावी , यासाठी विविध संस्था आपले राज्य सरकार , विविध संघटना आरोग्य कर्मचारी प्रयत्न करत आहेत . याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ( प्राथमिक विभाग ) या शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते पूढे सरसावले व त्यांनी तालुक्यातील शिक्षकांना मदतीचे आवाहन करुन मदतनिधी जमा केला.त्यातून कोरोना प्रतिबंधक साहित्य खरेदी करून तालुक्यातील आरोग्य केंद्रात वाटप केले.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मा . राज्याध्यक्ष राजेश सुर्वे , मा . जिल्हाध्यक्ष संजय निजापकर यांचे प्रेरणेने जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात विविध उपक्रम राबविणेत येत आहेत . त्याचाच एक भाग म्हणून कर्जत तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक साहित्याचे वाटप बुधवार दिनांक -12 05 2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कडाव येथे माननीय गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी या सामजिक कार्याबद्दल शिक्षक परिषदेचे आभार मानले यावेळी कडाव येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यालयीन चिटणीस भगवान घरत कर्जत तालुका आरोग्य अधिकारी माननीय डॉक्टर सी के मोरे कडाव आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीमती भामरे मॅडम आरोग्य सेविका कटारे मॅडम उपस्थित होत्या.तसेच शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष मोहन पाटील कोकण विभाग प्रतिनिधी भास्कर थोरवे तालुका उपाध्यक्ष हरिश्चंद्र जाधव ग्रामसेवक, दादाराव कोळसकर हे उपस्थित होते . या उपक्रमाअंतर्गत प्रा . आ.केंद्र आंबिवली , प्रा.आ.केंद्र नेरळ येथेही साहित्य वाटप करण्यात आले तसेच कर्जत पंचायत समिती कार्यालय येथेही साहित्य वाटप करण्यात आले . यावेळी ही गटविकास अधिकारी बालाजी पुरी , सहाय्यक गटविकास अधिकारी राजपूत साहेब शिक्षण विभाग वरिष्ठ लिपिक पेणकर ,पानमंद अण्णा , पत्रकार संतोष दळवी हे उपस्थित होते . या उपक्रमाअंतर्गत मदत निधी जमा करण्यासाठी परिषदेचे पदाधिकारी गणेश चित्ते , अर्जुन पगारे ( कवी मानव ) परशुराम राठोड मंगेश कर्पे , नरेश म्हसे , शशिकांत पालकर , जगदिश् ऐनकर , भुजंग दौंड , गवळी , सतीश कांबळे , यांनी मोलाचे सहकार्य केले .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close