आरोग्य व शिक्षण

चांदवडला लसीकरण केंद्रावर अँटिजेंन बंधनकारक

चांदवडला लसीकरण केंद्रावर अँटिजेंन बंधनकारक

उदय वायकोळे चांदवड

चांदवड शहरात जनता विद्यालयात सुरू असलेल्या कोविड लसीकरण केंद्रात आजपासून अँटिजेंन चाचणी बंधनकारक केलेली आहे.आज लसीकरण केंद्रावर सुरुवातीस 100 कुपन देण्यात आले होते.व त्यानुसार प्रत्येक कुपनधारकाची अँटिजेंन चाचणी केली जात होते.यात चाचणी निगेटिव्ह आलेल्या नागरिकांनाच दुसऱ्या लसीचा डोस दिला जात असल्याचे चित्र पहावयास मिळते.चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीस तात्काळ उपचार घेण्यासाठी जाण्याचा सल्ला आरोग्य विभागाचे कर्मचारी देत होते.
चाचणी करण्याचे बंधनकारक केल्याने इतर नागरिक व कर्मचारीसुद्धा त्यामुळे पुढील धोक्यापासून दूर राहू शकतात अन्यथा काही नागरिक लक्षणे असतानासुद्धा आरोग्य कर्मचाऱ्यास न कळविता फक्त आपल्याला लस कशी मिळेल या भावनेने येत होते असे आरोग्य पर्यवेक्षक वाय बी जाधव यांनी सांगितले.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी श्री पंकज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे श्री गायकवाड,श्री घनश्याम आंबेकर,श्री घाटे,श्री संदीप महाले सर व इतर कर्मचारी अतिशय शिस्तबध्द पध्दतीने चाचणी झालेल्या नागरिकांना विशिष्ट अंतर ठेवून नोंदणी करून लसीकरणाची आत सोडत होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close