ताज्या घडामोडी

नाशिक जिल्ह्यात कडक लॉकडाऊन* *बुधवार 12/05/2021ला 12.00PM पासून कडक लॉकडाऊन* चालु आहेत यात_*काय सुरू काय बंद*_

नाशिक जिल्ह्यात कडक लॉकडाऊन*
*बुधवार 12/05/2021 12.00PM पासून कडक लॉकडाऊन* चालु आहेत यात
_*काय सुरू काय बंद*_

१. कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास संपुर्णत: बंदी राहील.

2. सर्व किराणा मालदुकाने, बेकरी, मिठाई व तत्सम दुकाने तसेच पाळीव प्राण्याच्या जीवनावश्यक बाबींची दुकाने सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 याकालावधीत केवळ घरपोच सेवा देण्यासाठी सुरू राहतील. ग्राहक या आस्थापनांमध्ये येणार नसून ग्राहकांनी नोंदवलेल्या मागणीप्रमाणे दुकानदार माल घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था करतील.

नियोजन संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था करतील. बाबतचे दुध संकलन केंद्रे व घरपोच दुध वितरण व्यवस्था यांना संकलन व घरपोच विक्रीसाठी सकाळी 07.00 ते 12.00 वा. आणि केवळ संकलनासाठी सायंकाळी 05.00 ते 07.00 वा. परवानगी राहील.

३. हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, मद्यविक्री केंद्रे यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 व सायंकाळी 5.00 ते 07.00 वाजेपर्यंत सुरु राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास या आस्थापनांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

4. ज्या ठिकाणी ग्राहक आढळुन आल्यास संबंधीत आस्थापनेवर कायदेशिर कारवाई केली जाईल. याबाबतीत पर्यवेक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक पोलीस अधिकारी यांची राहील.

5. शिव भोजन थाळी केंद्र सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत सुरु राहील व तेथून केवळ पार्सलद्वारे अन्नपदार्थ वितरित होतील. तेथे बसून भोजन करणे प्रतिबंधित राहील. याबाबतीत पर्यवेक्षणाची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारीयांची राहील.

6. शासकीय रास्त भाव दुकाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांप्रमाणे सुरू राहतील

7. याकाळात कालावधीत जिल्हयातील सर्व कृषी उत्पनबाजार समित्या बंद राहतील. शेतकन्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था विकेंद्रित पद्धतीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीची राहील. याबाबत समन्वयाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांची राहील.

8. या कालावधीत जिल्हयातील सर्व भाजी मार्केट आणि आठवडी बाजार बंद राहतील. भाजी मार्केट पूर्णतः बंद ठेवून रस्त्याच्या कडेला सुरक्षित अंतरावर आखणी करून देऊन सकाळी 07.00 ते 12.00 या वेळात भाजी, फळे विक्री करण्यासाठी जागा निश्चित करून देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची राहील. फिरत्या हातगाडी वरून वरील वेळेतच भाजीपाला व फळे विक्री करणेस परवानगी राहील.

9. औषध निर्मिती व ऑक्सिजन निर्मिती वगळता अन्य उद्योग केवळ इन सिटू पद्धतीने सुरू राहतील. या आस्थापना चालकांनी कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करावा व या मनुष्यबळाची निवास भोजन व्यवस्था कामाचे ठिकाणी अथवा नजीकच्या ठिकाणी करावी.

या सर्व मनुष्यबळाचे दर दहा दिवसानंतर रॅपिड एंटीजन टेस्ट करणे देखिल अनिवार्य राहील. या सूचनांचे पालन करू न शकणारे उद्योग बंद राहतील. याबाबत सनियंत्रण करण्याची जबाबदारी प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नाशिक व स्थानिक पोलीस स्टेशनची राहील.

10. औद्योगिक व इतर वस्तुंची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक आंतर जिल्हा, आंतरराज्य वाहतुक, शासकीय नियमानुसार सुरु राहिल. कच्च्या व पक्क्या मालाची वाहतुक निरंतर करता येईल. नाशिक जिल्हयातुन इतर जिल्हयात जाणान्या माल वाहतुक वाहनांना प्रवेश राहिल, त्यांना जिल्हयात कोठेही थांबता येणार नाही.

11. सर्व प्रकारची बांधकामे केवळ इन सिटू पद्धतीने सुरू राहतील. या आस्थापना चालकांनी कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करावा व या मनुष्यबळाची निवास व भोजन व्यवस्था कामाचे ठिकाणी अथवा नजीकच्या ठिकाणी करावी. या सर्व मनुष्यबळाचे दर दहा दिवसानंतर रॅपिड एंटीजन टेस्ट करणे देखिल अनिवार्य राहील. याबाबत सनियंत्रण करण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची राहील.

12. कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधीत दुकाने सकाळी 07.00 ते सकाळी 12.00 या वेळेत सुरु राहतील. या बाबी देखील गाव स्तरावर विकेंद्रित पद्धतीने वितरित करण्याचे नियोजनाची जबाबदारी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक यांची राहील.

13. सार्वजनिक, खाजगी क्रीडांगणे, मोकळया जागा, उद्याने, बगिचे पुर्णत: बंद राहतील.

14. शाळा महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारची शिकवणी वर्ग संपुर्णतः बंद राहतील. तथापि ऑनलाईन शिक्षणास प्रतिबंध राहणार नाही. नियोजन व नियंत्रण करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (माध्यमीक)

15. जि.प. नाशिक यांची राहील. सर्व प्रकारचे स्वागत समारंभ हॉल, मंगल कार्यालये, लॉन व तत्सम ठिकाणे हे पूर्णत: बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास नोंदणी पद्धतीने विवाह नोंदणी कार्यालयात करण्यात यावा. यावेळी पाच व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तीना उपस्थित राहता येणार नाही. या सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी होत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी विवाह नोंदणी कार्यालय प्रमुख यांची राहील. या निर्देशाचे उल्लंघन होवून लग्न समारंभ अन्यत्र आयोजीत झाल्यास आयोजक व उपस्थित सर्वाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय दंड संहिता, 1860 नुसार कारवाई संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी करतो.

16. अत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 व्यक्ती व तदनंतरचे विधीसाठी जास्तीत जास्त 15 व्यक्तीइतकी उपस्थितोचो मर्यादा राहील, या मर्यादेचे नागरिकांनी बिनचूकपणे पालन करावे व याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी उचित दक्षता घ्यावी. 17. सर्व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरणतलाव, करमणुक व्यवसाय नाटयगृह, कलाकेंद्र, प्रेक्षकगृहे, सभागृहे संपुर्णत: बंद राहतील.

18. खाजगी व सार्वजनीक वैद्यकीय सेवा, पशुचिकीत्सक सेवा, त्यांचे नियमीत वेळेनुसार सुरु राहतो.

19. मेडीकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन औषध सेवा 24 तास कालावधीत सुरु राहतील.

20) लसीकरण केंद्रे कोरोना विषयक सर्व प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करून सुरू राहतील. केंद्र सुरू करताना किती नागरिकांचे लसीकरण होणार आहे ती संख्या दर्शविणारा फलक दर्शनी ठिकाणी लावावा व लसीकरण केंद्राचे प्रमुखाने अनावश्यक गर्दी हटवून वेळोवेळी तितकेच लोक लसीकरण केंद्राजवळ रांगेत राहतील, हे पाहावे. यासाठी स्थानिक पोलिस स्टेशन अधिकारी यांनी केंद्र चालकांना सहकार्य करावे.

21) सर्व पेट्रोल पंपावर परवानगी दिलेल्या वाहनांसाठीच पेट्रोल वितरित करण्यात यावेत. माल वाहतूक, रुग्णवाहिका, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, परवानगी पास असलेली वाहने यांच्यांकरीता पेट्रोल-डिझेलची उपलब्धता करुन द्यावी. याबाबतची जबाबदारी कंपनीचे अधिकारी व उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांची राहील.

22) गॅस एजन्सीज मार्फत घरपोच गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात यावे. परंतु ग्राहकांनी गॅस एजन्सीमध्ये प्रत्यक्ष येऊन गॅस नोंदणी करण्यास अथवा सिलेंडर घेण्यास प्रतिबंध राहील. गॅस एजन्सी येथे ग्राहक आढळून आल्यास संबधित एजन्सी कारवाईस पात्र राहील. पर्यवेक्षणाची जबाबदारी संबंधित ऑईल कंपनी-जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील.

२३) सर्व बँका, पतसंस्था, पोष्ट ऑफसेस ही कार्यालये नागरिकांसाठी केवळ अत्यावश्यक कामासाठी सकाळी 09.00 ते दुपारी 12.00 पर्यंत सुरु राहतील. तसेच ग्राहकांना ऑनलाईन सेवा पुरविण्यात याव्यात.

2४. शासकीय यंत्रणामार्फत मान्सुनपुर्व विकास कामे आवश्यक पाणी पुरवठा व टंचाई विषयक कामे चालू राहतील, संबधित शासकीय यंत्रणांना याकरीता वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.

२५) सर्व शासकीय कार्यालये अभ्यागंतासाठी पुर्णतः बंद ठेवण्यात येत आहेत. अत्यावश्यक कामासाठी संबंधित कार्यालयाचे ई-मेल अथवा दूरध्वनी सुविधेचा वापर करावा.

२६ )सेतू व आपले सरकार सेवा केंद्र अभ्यागतांसाठी बंद राहतील. पुर्णतः ऑनलाईन असलेल्या सेवा सुरू राहतील.

27) ई-कॉमर्समार्फत अत्यावश्यक घरपोच सेवा सुरु राहतील. तसेच स्थानिक दुकानदार, हॉटेल यांचेमार्फत घरपोच सेवा पुरविणारे कामगार यांच्याकडे ग्राहकांच्या घरी जाताना बिल व संबधीत दुकानदारांमार्फत देण्यात येणारे ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील, याबाबतचे नियोजन संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी करावे. संबधित कर्मचाऱ्यांना निगेटीव्ह RTPCR चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील.

२८) सर्व सार्वजनिक तसेच खाजगी बस वाहतुक, रिक्षा चारचाकी व दुचाकी वाहने यांची वाहतुक नागरिकांना अत्यावश्यक कामाकरीता फक्त अनुज्ञेय राहील, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील. तसेच रुग्णांकरीता रिक्षा व खाजगी वाहनास परवानगी राहील. याबाबतीत नियंत्रण व नियोजनाची जबाबदारी प्रादेशिक परिवहन विभाग /पोलीस वाहतूक शाखेकडे राहील.

29) जिल्हयाच्या माल वाहतुक व रुग्ण वाहतूक करणान्या वाहनास व शासकीय वाहनास स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही. तथापि मालवाहतूक साठा, खतसाठा इ. बाबतीत फक्त लोडीग व अनलोडींग करण्यास परवानगी अनुज्ञेय राहील. इतर कारणांकरीता व आवश्यक वैद्यकीय कारणांकरीता जिल्हयाबाहेर व आंतरजिल्हा वाहतूक करावयाची असल्यास https://covid19.mhpolice.in/ यावेबसाईटवरुन ई-पास काढून वाहतूक करता येईल.

३०)या सर्व नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या-त्या मुद्यांप्रमाणे नेमून दिलेल्या सक्षम अधिकाऱ्यांची राहील व त्यांना घटना व्यवस्थापकाचे सर्व अधिकार प्रदान करण्यात येत असून त्याप्रमाणे यथोचित कार्यवाही करून वेळोवेळी आपत्कालीन कार्य केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे अहवाल सादर करणे त्यांच्यावर बंधनकारक राहील, निर्बंधांचा अधिक चांगला परिणाम साधण्याच्या दृष्टीने प्रतिबंधित क्षेत्राच्या व्यवस्थापनासंदर्भात वेळोवेळी

31) केंद्र, राज्य शासनाने दिलेल्या व स्थानिक बैठकांमध्ये दिलेल्या निर्देशांची तसेच टेस्ट, ट्रैक, ट्रिट व व्हॅक्सीनेट या चतुसूत्रीची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी या कालावधी दरम्यान संबंधित विभागांनी करावी.

32) हे आदेश सर्व आस्थापनांना काटेकोरपणे होतील तसेच कोणत्याही विशेष परवानगी दिनांक 23/05/2021 पर्यंत देण्यात येणार नाही.

33) या आदेशात स्पष्ट उल्लेख केलेल्या बाबी सोडून इतर सर्व निर्बंध व नमुद शासन अधिसूचनेप्रमाणे तसेच यापुढे ही सुरु राहतील. तसेच ज्या आस्थापना सुरू राहण्यासाठी या आदेशाद्वारे परवानगी देण्यात आली आहे तिथे कोरोना विषयक सर्व प्रतिबंधात्मक बाबींची खबरदारी घेणे अनिवार्य राहील. त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आस्थापना चालकांची राहील. अन्यथा अशा आस्थापना बंद करून संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येईल व ती जबाबदारी संबंधित घटना व्यवस्थापकांची राहील.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close