ताज्या घडामोडी

ईद सादगी से मनाये ! रमजान ईदच्या पार्श्वभूमिवर मनमाड शहर मस्जिद तर्फे नागरिकांना आवाहन

ईद सादगी से मनाये !

रमजान ईदच्या पार्श्वभूमिवर मनमाड शहर मस्जिद तर्फे नागरिकांना आवाहन

पोलीस टाईम्स प्रतिनिधी. अफरोज अत्तार

मनमाड:- रमजान ईदच्या पार्श्वभूमिवर लाखो रुपयांची उलाढाल न करता या गरिबांची मदत करत रमजान ईद (ईद उल फित्र) साजरी, आवाहन मनमाड नगीना मस्जिद तर्फे फलकाद्वारे करण्यात आले.

कोरोनाच्या प्रकोपामुळे देशात हाहाकार सुरू असतांना देशभरातील सर्व धर्मांच्या लोकांनी आप आपले सण साध्या पद्धतीने घरातच साजरे करून कोरोनाच्या लढ्यात साथ दिली आहे. आपणही त्यात सहभागी होत सध्या पध्दतीने ईद साजरी करावी असे आवाहन नगीना मस्जिद ( मरकज ) मनमाड यांनी केले आहे.

रमजान ईद या सणाच्या निमित्ताने नवे कपडे खरेदी करणे, वस्तू खरेदी करणे यात लाखोंची उलाढाल होते. मात्र सध्या गरज आहे ती गजरवंतांना मदतीची. ईद साजरी करतांना नविन कपडे व इतर सामानाची खरेदी न करता त्याच पैशातून गरिबांची मदत केल्यास एक वेगळे समाधान प्राप्त होईल. ईदचा खरा अर्थ थोडक्यात सांगायचे म्हणजे लोकांची सेवा यातच खरा आनंद आणि लोकांना मदत हाच खरा सण असल्याचे नगीना मस्जिद (मरकज) यांनी मस्जिद बाहेर लावलेल्या फलकाद्वारे सांगितले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close