क्राईम

गांवगुंडानो सावधानतेचा इशारा देणाऱ्या सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांची सोलापूर नियंत्रण कक्षाला तडकाफडकी बदली*

*गांवगुंडानो सावधानतेचा इशारा देणाऱ्या सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांची सोलापूर नियंत्रण कक्षाला तडकाफडकी बदली*

*सांगोला/विकास गंगणे*

गाव गुंडाच्या मुसक्या आवळू दादागिरी गुंडगिरी करणाऱ्याची गय केली जाणार नाही अवैध धंद्याला थारा दिला जाणार नाही असे सांगोला शहराबरोबरच ग्रामीण भागात नुसते होर्डिग लावून कडक पणाचा आव आणणाऱ्या पोलीस निरीक्षक साहेबाची तडकाफडकी सोलापूर नियंत्रण कक्षाला बदली झाल्याने सांगोला पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्गातून एकच खळबळ उडाली आहे

सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगोला तालुक्यांमध्ये होर्डिंग लावून दहशतवाद्याला थारा देणार नाही गावगुंडांनो सावधान अशा प्रकारचे होर्डिंग लावून नव्याचे नऊ दिवसा प्रमाणे गाव गुंडांच्या मुसक्‍या आवळणे सोडाच परंतु अवैध धंदे वाल्यांना हाताशी धरून दारू मटका जुगार यांच्याशी आर्थिक देवाण-घेवाण करून सर्वसामान्य नागरिकांवर दहशत बसविण्याचे काम केले सांगोला तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे सुरू असून देखील सांगोला पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी एकाही अवैध धंद्यावर छापे मारी करून कारवाई केली नसल्याचे दिसून आल्यानेच सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी भगवान निंबाळकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेले आहे निबाळकर साहेबाची बदली केवळ खाजगी कारणाने झाली असल्याचे बोलले जात असले तरीही त्यांनी दोन नंबरवाल्याशी ठेवलेले संबध हाही चर्चेचा विषय बनलेला असून थोड्याच कालावधीत पोलीस निरीक्षकाचा पदभार स्विकारलेल्या भगवान निंबाळकर यांचेवर अचानक तडकाफडकी बदलीची नामुष्की का आली याबाबत सांगोला शहर ग्रामीण भागातून चर्चेला उधाण येत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close