ताज्या घडामोडी

जमावबंदी चा आदेश झुगारुन उल्हासनदीवर नागरिकांची गर्दी ; प्रशासनाचे दुर्लक्ष ,

जमावबंदी चा आदेश झुगारुन उल्हासनदीवर नागरिकांची गर्दी ;
प्रशासनाचे दुर्लक्ष ,

कर्जत :- दिपक बोराडे
कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हासनदी विविध किनाऱ्यावर सध्या संध्याकाळच्या वेळी तुडुंब गर्दी होत आहे.शासनाने विकेंड लॉकडाऊन मध्ये संचारबंदी लावली आहे तर लॉक डाऊन मध्ये जमावबंदी लावून कडक निर्बंध लावले आहेत. दरम्यान,अशावेळी लोक घराबाहेर पडत असताना महामारी रोखण्यासाठी जमावबंदी आहे मग प्रशासन कारवाई करीत नाही?याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
कर्जत तालुक्यातून वाहणारी उल्हास नदी हि पुढे वाकस,कोल्हारे,भाकरीपाडा, तळवडे,धामोते,हंबरपाडा,दहिवली,मालेगाव अशी नेरळ,ममदापुर,भडवळ, शेलू,बदलापूर आदी भागातून पुढे कल्याणला खाडीत जाऊन मिळते.मात्र या उल्हास नदीचे पाणी बारमाही वाहणारी नदी आहे.उन्हाळ्यात सायंकाळी उल्हासनदीच्या या सर्व ठिकाणी लोकांची गर्दी असते. पाण्यात पोहणे, नदीतीरावर पाण्यात खेळणे आदी उद्योग त्यांच्याकडून होत आहेत. तर यावेळी सामाजिक अंतर राखणे, मास्क घालणे,आदी नियमांचा आणि मुख्य म्हणजे जमावबंदी तसेच विकेंड संचारबंदी याकडे लोकांनी डोळेझाक केली असल्याचे दिसून येते.मात्र प्रशासनाला शासनाने सर्व अधिकार दिले असल्याने माणसे रस्त्यावर उतरताच कशी?असा प्रश्न समोर आला आहे.
कोरोना महामारीमुळे देशात सर्वत्र भीतीचे वातावरण असताना कर्जत तालुक्यात मात्र बेफिकीरपणे लोकांचे घराबाहेर पडणे सुरूच आहे. कोरोनाचा फैलाव आणि मृत्यूचे प्रमाण समोर असताना देखील अशी स्थिती कर्जत तालुक्यातील उल्हासनदीवर विविध ठिकाणी पाहायला मिळत असल्याने प्रशासन काय करते आणि लोकांनी काय ठरवले आहे?याची चर्चा सुरू आहे.

केशव तरे-कार्यकर्ते,उल्हासनदी बचाव समिती यंदा कोरोनाची दुसरी लाट तीव्र आहे. परंतु तरीसुद्धा आताही जमावबंदी, संचारबंदी सारखे नियम मोडत नागरिक नदीवर पिकनिक साजरी करायला येतात. कर्जत तालुक्यात वाढत्या कोरोना संक्रमणाच्या काळात या गोष्टी चुकीच्या आहेत.

यशवंत भवारे-माजी उपसरपंच, दहिवली ग्रामपंचायत
आम्ही ग्रामपंचायत तर्फे दहिवली उल्हास तीरावर फलक लावलेला आहे. त्यानुसार पोलीस प्रशासनाला ग्रामपंचायतच्या वतीने पत्रव्यवहार करून त्यांच्या मदतीने नियमांचे भंग करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई पोलिसांनी करायला हवी.

तानाजी नारनवर-पोलीस निरीक्षक, नेरळ पोलीस ठाणे
शासनाच्या आदेशाप्रमाणे लोकांनी आपली जबाबदारी समजून या महामारी पासून आपले आणि आपल्या समाजाचे रक्षण केले पाहिजे.पण लोक नवनवीन मार्ग शोधून बाहेर पडत आहेत,त्याबद्दल आम्ही अहवाल सादर केला आहे आदेश आल्यास कारवाई सुरू केली जाईल.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close