ताज्या घडामोडी

सांगोला नगरपरिषदेस केंद्र सरकार कडून “ओडीयफ प्लस प्लस” मानांकन प्राप्त* *शहरास प्रथमच मिळाला हा बहुमान*

*सांगोला नगरपरिषदेस केंद्र सरकार कडून “ओडीयफ प्लस प्लस” मानांकन प्राप्त*
*शहरास प्रथमच मिळाला हा बहुमान*

*सांगोला/विकास गंगणे*

केंद्र सरकारच्या वतीने देशास हागणदारीमुक्त करणे व घनकचरा व्यवस्थापन करणे यासाठी 2014 पासून ”स्वच्छ भारत अभियान’ राबविले जात आहे. या अभियानास गती मिळावी या उद्देशाने देशातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण’ नावाची स्पर्धा 2016 पासून दरवर्षी केंद्र सरकार मार्फत घेतली जाते. याचा एक भाग म्हणून सांगोला शहरातील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून त्याआधारे सांगोला नगरपरिषदेस केंद्र सरकारचे ‘ओडियफ प्लस प्लस(ODF++)’ हे मानांकन प्राप्त झाल्याची माहिती मुख्याधिकारी श्री.कैलास केंद्रे यांनी दिली.
केंद्र सरकारच्या पथकामार्फत दिनांक 3,4 मार्च 2021 रोजी शहरातील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करण्यात आली होती.यात सार्वजनिक शौचालयातील लाईट, पाणी, रॅम्प, स्वच्छता, रंगरंगोटी,स्वच्छतेचे संदेश देणारे चित्र/बॅनर,वृक्षारोपण इत्यादी बाबींची तपासणी करण्यात आली होती. केंद्र सरकारचे निकष पूर्ण करत असल्याने सांगोला नगरपरिषदेस 8 मे 2021 रोजी ‘ओडी यफ प्लस प्लस’ मानांकन मिळाल्याचे जाहीर केले गेले.
शहरास प्रथमच मिळालेले हे मानांकन मिळवून देण्यासाठी मा.नगराध्यक्षा सौ.राणिताई माने,आरोग्य सभापती श्री.रफिक भाई तांबोळी,मुख्याधिकारी श्री.कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक संजय दौंडे,शहर समन्वयक शिवाजी सांगळे व सर्व सफाई कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

नागरिकांचे सहकार्य आणि सफाई कर्मचाऱ्यांची मेहनत यामुळेच शहरास हा बहुमान मिळाला आहे. आवश्यक त्या सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती लवकरच केली जाणार असून नागरिकांनी यापुढेही त्यांचा वापर जबाबदारी ने करून सहकार्य करावे.कोरोनाच्या वातावरणात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अमूल्य आहे.

*कैलास केंद्रे,मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद*

केंद्र सरकार मार्फत असे मानांकन मिळणे हे सर्व शहर वासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. येत्या काळात शहरातील सार्वजनिक शौचालयांचा दर्जा याहून चांगला करण्याचा प्रयत्न करू.
*सौ.राणिताई माने,नगराध्यक्षा, सांगोला नगरपरिषद*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close