ताज्या घडामोडी

ठेकेदाराच्या हितासाठी निविदा प्रसिद्ध होण्याआधीच काम सुरू करणाऱ्या मोर्डे ग्रामपंचायत सरपंचावर कारवाई करा!*

मालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070

*ठेकेदाराच्या हितासाठी निविदा प्रसिद्ध होण्याआधीच काम सुरू करणाऱ्या मोर्डे ग्रामपंचायत सरपंचावर कारवाई करा!*

🔴 *ग्रामपंचायत सदस्य नितीन गोताड यांची जिल्हा परिषद सीईओ यांच्याकडे ईमेलद्वारे मागणी*

देवरुख:-संगमेश्वर तालुक्यातील मोर्डे ग्रामपंचायत अंतर्गत करंबेळे तर्फे देवळे,झोरेवाडी येथे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून आरसीसी विहीर बांधकाम साठी निधी मंजूर झाला आहे,मात्र निविदा प्रसिद्ध होण्याआधीच काम सुरू झाल्याने निविदेचे नाटक कशाला?संबंधित सरपंच यांची याबाबत चौकशी करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नितीन गोताड यांनी जीप सीईओ यांच्याकडे केली आहे.

निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधी आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यामागे भ्रष्ट हेतू असल्याचा आरोप नितीन गोताड यांनी जिल्हा परिषद सीईओ यांना दिलेल्या पत्रात केला आहे.या कामाबाबत निविदा प्रसिध्द होण्या आधीच व सदर प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच सदर काम सुरू करण्यात आले असून ग्रामपंचायत मधील सरपंच व अधिकारी यांचे पाठबळआहे का?याची चौकशी होणे गरजेचा आहे.असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

जर टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्याआधी अशी कामे दिली जात असतील तर निविदा प्रक्रिया नंतर करण्याचे नाटक का?हा प्रश्न असून अशा प्रकारांमुळे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत आहे.शिवाय हा प्रकार संगनमत करून केला जात असल्याने याचा

कामावर परिणाम होतो व दर्जा राखला जात नाही.शिवाय निकोप स्पर्धा देखील या प्रकाराने नाकारली जाते.परिणामी माझी आपणाकडे विनंती आहे की आपण या प्रकरणाची चौकशी करून असे नियमबाह्य काम करणाऱ्या मोर्डे करंबेले ग्रामपंचायतच्या संबंधित सरपंच व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी विनंती ग्रामपंचायत सदस्य नितीन गोताड यांनी केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close