आरोग्य व शिक्षणकृषीताज्या घडामोडीमराठवाडा

कोरोना काळात विवाहाचे नियम उल्लंघन वर पित्यास ५० हजार रुपये दंड .

कोरोना काळात विवाहाचे नियम उल्लंघन

वर पित्यास ५० हजार रुपये दंड .

तालुक्यातील पहिलीच घटना

औसा प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी व कोरोनाचा प्रसार रोखला जावा या उद्देशाने विवाहाबाबत कडक निर्बंध लादले आहेत .२५ नातलगांच्या उपस्थित विवाह समारंभ दोन तासांच्या आत संपवावा असा नियम घालून दिलेला असताना विवाह समारंभात कोरोनाचे नियम मोडल्याबद्दल औसा तालुक्यातील भंगेवाडी येथे वर पित्यास ५० हजार रुपयांचा दंड आकारण्याची घटना औसा तालुक्यात घडली आहे .

याबाबतची सविस्तर माहिती अशी की सोमवार दि 3 मे 2021 रोजी औसा तालुक्यातील भंगेवाडी येथील निळकंठ माधवराव पाटील यांच्या मुलाचे लग्न कबनसांगवी ता. चाकूर येथील मुलीशी भंगेवाडी येथे आयोजित करण्यात आले होते . कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असताना गर्दी टाळण्याचे व प्रशासनाने घालून दिलेले नियम मोडून 25 पेक्षा अधिक लोकांना लग्नात जमा केल्याने 50 हजार रुपयांचा रोख दंड ग्रामसेवकाने आकारून संबंधीतास दंडाची पावती दिली . लग्नासाठी 25 पेक्षा अधिक नातेवाईक जमा होऊन गर्दी झाल्याचे कळताच किनीथोटे येथील बीट अंमलदार राजेश लामतुरे , ग्रामसेवक अर्चना उटगे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली .भंगेवाडी ता. औसा येथे लग्नात गर्दी केल्याची तक्रार अनेकांनी वरिष्ठाकडे केल्याने या घटनेची गंभीर दखल घेऊन नवरदेवाच्या वडीलांना ५० हजार रुपये रोख दंड आकारला . दंडाच्या रक्कमेची पावती ग्रामसेवक अर्चना उटगे यांनी निळकंठ माधवराव पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.

विवाहसोहळ्यात नियमापेक्षा अधिक लोकांना सहभागी केल्याने आर्थिक दंड आकारण्याची औसा तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे . विवाहाच्या कार्यक्रमात नवरदेवाच्या पित्याला 50 हजार रुपयांचा दंड झाल्याने औसा तालुक्यात खळबळ उडाली असून विनापरवाना व नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड वसूल करण्याची औसा तालुक्यातील ही पहिल्याच खळबळ उडाली असून या घटनेने विवाह कुटुंबाने पुढील काळात सावधानता बाळगली पाहिजे अशी प्रशासनाने अपेक्षा व्यक्त केली आहे .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close