आरोग्य व शिक्षण

भय इथले संपत नाही ……. चोवीस तासात चौघांचा मृत्यू ;गावात लागला जनता कर्फ्यू !

एकनाथ भालेराव,येवला प्रतिनिधी

भय इथले संपत नाही …….
चोवीस तासात चौघांचा मृत्यू ;गावात लागला जनता कर्फ्यू !

एकनाथ भालेराव,येवला प्रतिनिधी :-

सायगाव : येवला तालुक्यातील सायगावमध्ये गेल्या महिनाभरात जवळपास बारा कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. तर २ मे च्या सायंकाळपासुन तर आज दिनांक ३ मे च्या दुपारपर्यंत अवघ्या चोवीस तासाच्या आत चार कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली असून जणू मृत्यूचे भय इथले संपत नाही. अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
कोरोनाच्या महामारीत पहिल्या लाटेत वर्षभरात दोन चार संशयीत रूग्ण दगावले मात्र तेंव्हा मरणाच्या भयाची चाहूल ऐवढी गडद वाटली नव्हती. मात्र कोरोनाची महामारी गावात नाही तर वाडी वस्तीवरच्या घरा- घराच्या उंबऱ्यापर्यंत येवून ठेपल्याने मृत्यूचे भय जणू गावात तांडव करत आहे.
वर्षभरात शासन आदेशानुसार स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत कार्यालयामार्फत अनेक उपाययोजना करण्यात आल्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सायगाव ग्रामपंचायतीने वेळोवेळी बैठका घेवून ठोस उपाययोजना केल्या. दोन वेळेस कोरोना लसीकरण शिबीर राबविण्यात आले. घरोघरी जावून लक्षणे बाधित रुग्णांची तपासणी करण्यात आली. मात्र वाढते कोरोना बाधीत रूग्ण आणि मृत्यूचे प्रमाण बघता आज दि. ३ मे रोजी ग्रामपंचायतीने सात दिवसाचा जनता कर्फ्यू घोषित केला. मेडीकल व दुधसंकलन केंद्र वघळता सात दिवस गाव बंदचा आदेश जारी करण्यात आला आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. सदर बैठकीस सरपंच अनिता खैरनार,अशोक कुळधर गणपत खैरनार, रंजना पठारे, संदीप पुंड, दिपक खैरनार, भाऊसाहेब आहिरे, योगिता निघुट,अरविंद उशीर, दिनेश खैरनार,शरद लोहकरे, संतोष दौंडे, उल्हास उशीर, ग्रामसेवक प्रदीप बोडखे आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close