ताज्या घडामोडी

म्हसरूळ पोलीस स्टेशन कडील जबरी चोरीच्या गुन्हयातील २ वर्षापासुन फरार असलेला आरोपीस व मोटर सायकल चोरी करणारे ३ आरोपीतांस पंचवटी पोलीसांनी घेतले ताब्यात*

*म्हसरूळ पोलीस स्टेशन कडील जबरी चोरीच्या गुन्हयातील २ वर्षापासुन फरार असलेला आरोपीस व मोटर सायकल चोरी करणारे ३ आरोपीतांस पंचवटी पोलीसांनी घेतले ताब्यात*

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

नाशिक – पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या मोटर सायकल चोरीच्या गुन्हयांचा तसेच इतर चोरीच्या गुन्हयांचा छडा लावणे बाबत मा. श्री. दीपक पाण्डेय सो, पोलीस आयुक्त नाशिक, मा.श्री. अमोल तांबे सो, पोलीस उपआयुक्त परिमंडळ १, नाशिक शहर यांनी मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या.

त्यानुसार पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक भगत व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री अशोक साखरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्री सत्यवान पवार व त्यांचे सोबत असलेल्या पोलीस पथकाने दिनांक २६/०४/२०२१ ते दिनांक ०२/०५/२०२१ पावेतो या ०७ दिवसांचे कालावधीत खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणुन सदर गुन्हयात चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत केली आहे.

उघडकीस आणलेले गुन्हे

१) म्हसरूळ पोलीस स्टेशन कडील जबरी चोरीचा गुन्हा रजि नं. २११/२०१९ कलम ३९४,३४ भा.दं. वी या गुन्हयात २ वर्षापासुन फरार असलेला आरोपी उमेश आण्णा धोत्रे हा मुंबई येथुन त्याचे नातेवाईकांना भेटण्यासाठी नाशिक येथे आल्याची पंचवटी पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकास माहीती मिळाल्याने त्यांनी त्यास सापळा रचुन नवनाथ नगर, पंचवटी, नाशिक येथुन ताब्यात घेतले. त्यानंतर त्यास पुढील तपासकामी म्हसरूळ पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

२) पंचवटी पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ३४२ / २०१८ कलम ३७९ भा.दं. वि. प्रमाणे दाखल गुन्हा हा ०३ वर्षापूर्वी घडलेला असून सदर गुन्हयातील पाहीजे आरोपी व चोरीस गेलेली मालमत्ता ही दिंडोरी येथे असल्याची गोपनीय माहीती गुन्हे शोध पथकास प्राप्त झाली होती. त्यानुसार इसम नामे किरण गुलाब लांडे रा. दिंडोरी जि. नाशिक यास गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेवुन त्यास पोलीस ठाणेस आणुन त्याचेकडे गुन्हया बाबत तपास करून त्याचेकडुन सदर गुन्हयात चोरीस गेलेली ३५,०००/- रुपये किंमतीची पल्सर मोटर सायकल क्रमांक
MH-15-ET-0094 ही हस्तगत केली आहे.

३) पंचवटी पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. १३२ / २०२१ कलम ३७९ भा.द.वी या गुन्हयाचे घटनास्थळा वरील बिल्डींग मधील सी.सी.टी. व्ही फुटेजची तपासणी केली असता त्यामध्ये सदर बिल्डींगमध्ये राहणारा विधी संघर्षग्रस्त बालक याने गुन्हयात चोरीस गेलेल्या मोटार सायकलची चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर विधीसंघर्षित बालकाकडे गुन्हे शोध पथकाने तपास करून त्याचेकडुन सदर गुन्हयात चोरीस गेलेली २०,०००/- रुपये किंमतीची पल्सर मोटर सायकल कमांक MH12 FT 7528 हि हस्तगत केली आहे. तसेच त्याने सदरचा गुन्हा हा त्याला असणान्या व्यसनांची पूर्ती करण्यासाठी केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

@@@@@@@@@@@@@@@@@@@

नन्हे मुन्ने रोजादार  अल्हाह ईन नन्ने मुन्ने रोजादार के रोजे कबुल करे और देश दुनिया को कोविड से मुक्ती दिलाये ..आमिन

©©©©©©©©©©©©©©©©©©©©©©

*म्हसरूळ पोलीस स्टेशन कडील जबरी चोरीच्या गुन्हयातील २ वर्षापासुन फरार असलेला आरोपीस व मोटर सायकल चोरी करणारे ३ आरोपीतांस पंचवटी पोलीसांनी घेतले ताब्यात*

४) पंचवटी पोलीस ठाणे चे गुन्हे शोध पथकास रामकुंड परीसरात एक अभिलेखा वरील आरोपी संशयित रित्या घेवून पोलीस ठाणेस आणून त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव प्रतिक राजेंद्र धरणे रा सिडको, नाशिक असे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचेकडे त्याचे ताब्यात असलेल्या अॅक्टीवा मोटार सायकल बाबत तपास केला असता सदर मोटार सायकल ही लोणीकंद पोलीस ठाणे (पुणे शहर) येथील गुन्हा रजि नं १७१/२०२१ कलम ३७९ भा.दं. वि. या गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

अॅक्टीवा मो. सा. क्रमांक MH12 SC 7024 हि घेवुन फिरत असल्याची माहीती मिळाल्याने त्यास ताब्यात सदरची कामगीरी मा. श्री. दीपक पाण्डेय सो, पोलीस आयुक्त नाशिक शहर, मा. श्री. अमोल तांबे, पोलीस उप आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस स्टेशनचे वपोनि श्री. अशोक भगत, पोनि / अशोक साखरे, सपोनि / सत्यवान पवार, पोना/ दिलीप बोंबले, पोना/ सागर कुलकर्णी, पोशि/ विलास चारोस्कर, पोशि/कल्पेश जाधव, पोशि/ कुणाल पथलोरे, पोशि / राजु राठोड, पोशि/ घनश्याम महाले अशांनी कामगिरी केलेली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close