आपला जिल्हा

म्हैसाळ योजनेतील पाईपलाईनव्दारे वंचित क्षेत्र समाविष्ट करण्याबाबत हंगिरगे व डिकसळ ग्रामपंचायत कडून, जलसंपदा मंत्री यांना निवेदन* *ना.जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची जवळा व घेरडीला धावती भेट*व हंगिरगे येथील पाझर तलावाची पाहणी केली*

*म्हैसाळ योजनेतील पाईपलाईनव्दारे वंचित क्षेत्र समाविष्ट करण्याबाबत हंगिरगे व डिकसळ ग्रामपंचायत कडून, जलसंपदा मंत्री यांना निवेदन* *ना.जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची जवळा व घेरडीला धावती भेट*व हंगिरगे येथील पाझर तलावाची पाहणी केली*

*तालुक्यातील प्रलंबित सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी दिपक आबांनी केली आग्रही मागणी*

*सांगोला/विकास गंगणे*

मौजे वायफळ मधून अंत्राळ सिंगनहळ्ळी डि वाय डिकसळ हद्दीवरुन पुढे गेलेली आहे त्या हद्दीवरून डिकसळ लाभ क्षेत्रास 600 फुट अंतर आहे .ते काम पुर्ण केल्यास 700 हेव्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.त्यामध्ये आटपाडकर -उजणीकर -कोरे-करांडे-भुसनर -निळे- व इ शेतकऱ्यांचे क्षेत्र ओलीताखाली येण्यास मदत होईल.
तसेच वायफळ गावातून सांगोला डि वाय1 हि लाईन डिसकळ मार्गे लोहगाव व जवळा तलावास जात असुन यामध्ये 2000 फुट पाईप केल्यास डिकसळ मधील400हे भाग ओलीताखाली येण्याह मदत होईल.व हंगिरगे येथील पाझर तलावाचा ६५ m c F T क्षमतेचा असून सदर तलावपासून ७०० मीटर अंतरावरून मंगळवेढा वितरीका क्रं.१गेले आहे.परंतू हंगिरगे पाझर तलावाचा समावेश म्हैसाळ योजनेत नाही. तरी पाझर तलावाच्या समावेश म्हैशाळ योजनेत समावेश करून मिळावा सदर वितरीकेलाश्री भगवान साबळे वस्ती येथे आउटलेट व बंधिस्त पाईप लाईन करून हंगिरगे पाझर तलाव भरल्यास येथे गावडेवाडी मानेवाडी हुन्नूर येथील शेतकऱ्यांना लाभ होणार आह तसेच ह हंगिरगेे गावडे वाडी येथील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. मंगळवेढा वितरीका क्रं.१ला भगवान साबळे वस्ती जवळ आउटलेट काढून व बंदिस्त पाईप लाईन करून हंगिर्गे इरिगेशन टँक भरून मिळावा तसेच सावंत वस्ती ओढ्यात पाणी सोडून सदर ओढ्यातून हुन्नूर पर्यंत पाणी सोडून सावंत वस्ती ओढा ते हुन्नूर पर्यंतचे सर्व बंधारे भरून मिळाल्यास ह्या परीसरातील दुष्काळ दूर होणार आहे.तरी हंगिरगे पाझर तलाव व सावंत वस्ती ओढ्यावरील सर्व बंधारे भरण्यासाठी मंगळवेढा वितरीका क्रं.१ ला भगवान साबळे वस्ती जवळ आउटलेट काढून तलाव पर्यंत बंधिस्त पाईपलाईन करून मिळावी तसा आदेश संबंधित विभागाला व्हावेत असे या निवेदनामध्ये ग्रामपंचायत हंगिरगे सरपंच व ग्रामसेवक यांच्या सह्या आहेत. यामुळे याभागातील शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनात
लवकरात लवकर सर्वे करून क्षेत्र ओलीताखाली येण्यास मदत होईल असे सांगितले आहे.तरी यावेळी अनिल मोटे सभापती कृषी व पशुसंवर्धन जिल्हा परीषद सोलापूर,कय्युम आतार माजी सरपंच,भाऊसाहेब यमगर सर,फारुक आतार ग्रा.प.सदस्य,आमीर आतार,डिकसळचे चंद्रकांत करांडे सरपंच,हंगिरगेतील सरपंच ,विलास पावणे,उत्तम सावंत उपसरपंच,पोपट गुजले ग्रा.प.सदस्य,राजेंद्र साबळे,आप्पासो कोळेकर, कोळी ग्रामसेवक,बंडू साबळे,गुलाब साबळे,सुरेश काटे सर व घेरडी परीसरातील सर्व आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ सोशल डिस्टींग, मास्क लाऊन उपस्थीत होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close