ताज्या घडामोडी

*डफळापूर शाळेमध्ये कोविड सेंटरचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..

अतुल शिंदे/डफळापूर
9673614925
विजय तिकोटी(सांगली जिल्हा हेड)
9834181802

*डफळापूर शाळेमध्ये कोविड सेंटरचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन…..*

देशाबरोबर राज्यामध्ये कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढत असून यामध्ये अनेक रुग्णाचे बळी जात आहेत या अनुषंगाने जत तालुक्यात डफळापूर येथे रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेऊन दत्त पतसंस्थेचे चेअरमन मा बाबासाहेब माळी यांच्या पुढाकाराने व माननिय आमदार विक्रम दादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डफळापूर मध्ये तीस बेडचे कोविड सेंटर सुरू केले. मा. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले.यावेळी पालमंत्री जयंत पाटील,आमदार विक्रम सावंत व अदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार विक्रम दादा सावंत, प्रांत अधिकारी प्रशांत आवटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय बंडगर,चेअरमन बाबासाहेब माळी. पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, मा मार्केट कमिटी संचालक अभिजित दादा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कोविड रुग्णांना औषधे, गोळ्या, चहा,नाष्टा व जेवणाची व्यवस्था आम्ही केली आहे अशी माहिती बाबासाहेब माळी यांनी दिली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close