आरोग्य व शिक्षण

उसगाव श्रमजीवी कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्संट्रेटर भेट*

सुहास पांचाळ/पालघर* उसगाव/2 मे 2021

*उसगाव श्रमजीवी कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्संट्रेटर भेट*

*सुहास पांचाळ/पालघर*

उसगाव/2 मे : काल (दि.1 मे 2021) रोजी श्रमजीवी कोविड केअर सेंटरच्या उदघाटन प्रसंगी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधीपक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी या सेंटरसाठी 25 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर देतो असे आश्वासित केले होते, त्या प्रमाणे त्यांनी आज तातडीने 15 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर सेट उसगाव येथील श्रमजीवी कोविड केअर सेंटर येथे पाठवून दिले आहेत.

डॉ.विनय पाटील, डॉ.हेमंत सवरा, डॉ.समीर खिस्मतराव आणि डॉ.वर्षा पाटील यांनी आजच येथील कर्तव्यावर असलेले डॉक्टर्स डॉ.सुखदा आणि डॉ.माळी यांच्यासह सर्व स्टाफ ला या मशिन्स चे डेमोस्ट्रेशन दाखवले.

श्रमजीवी कोविड केअर सेंटर आणि *श्री विवेक भाऊ पंडित यांनी श्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close