आपला जिल्हा

१८ वर्षावरील युवकांनी लसीकरण करून घ्यावे- भूषण कासलीवाल यांचे जिल्हा वासीयांना आव्हान.

१८ वर्षावरील युवकांनी लसीकरण करून घ्यावे- भूषण कासलीवाल यांचे जिल्हा वासीयांना आव्हान.
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक -:जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या वर्षभरात अनेक वेगवेगळ्या संकटांना आपण लढा देत आहोत. वैज्ञानिकांनी मोठ्या कष्टाने लस शोधली. यानंतर जगभरात भारताने लसीचा पुरवठा केला. लसीकरणाचे उत्तम नियोजन करून विविध टप्प्यांमध्ये याची व्यवस्था करण्यात आली. देशभरात १६ जानेवारीला कोविड लसीकरणाला सुरुवात झाली.
नाशिक जिल्ह्यात सुद्धा १ मे ते पुढील काही दिवसात लवकरच या मोहिमेला व चौथ्या टप्याला सुरवात होणार आहे. यासाठी १८ वर्ष पुढील नागरिकांनी लस घेण्यासाठी तरुणांनी उस्फूर्तपणे लसीकरण करावे असे आव्हाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा समन्वयक भूषण कासलीवाल यांनी नाशिक जिल्ह्यातील जनतेला आव्हान केले आहे.
देशात १४ कोटी पेक्षा जास्त जणांना लस दिली गेली आहे. मात्र या भयंकर रोगाला घालवण्यासाठी आता तरुणांनी पुढे येऊन शहरात लसीकरणाचा प्रचार आणि प्रसार करायला हवा. कोरोनाचा वाढता आलेख आणि जिल्ह्याची लोकसंख्या बघता सगळ्यांनी लसीकरण करणे गरजेचे आहे. विविध भ्रम, निष्काळजीपणा, भीती न बाळगता शहरवासीयांनी लसीकरण करून घ्यावे व आपल्या जिल्ह्यातून कोरोनाला तडीपार करावे. असे आवाहन यावेळी श्री.भूषण कासलीवाल यांनी नाशिककराना केले आहे.
यासाठी आता लस नोंदणी ऑनलाइन करावी लागणार आहे ती कशी करावी याबाबत माहिती दिली त्यात गूगल वर cowin.gov.in वर जाऊन आपला मोबाईल नंबर नंतर ओटीपी आणि आधार फोटो आणि आधार नंबर जन्म वर्ष पुरुष किंवा स्री आणि सबमिट करावे आपण एका मोबाईल वरून घरचे 4 registration करू शकतो माझी सर्व नागरिकांना विनंती राहील आपण सर्वांनी आता न थांबता आपल्या भारताला समृध्द बनवण्यासाठी या अटी शर्तीचे पालन करणे गरजेचे आहे. तरुणांनी आपल्या शेजारी असलेले अशिक्षित परिवार जर असेल तर त्यांनाही मदत करावी. असे आवाहन भूषण कासलीवाल यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close