आरोग्य व शिक्षण

जिल्हा परिषद शाळा गिरणारे, ता इगतपुरी येथे इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न.

जिल्हा परिषद शाळा गिरणारे, ता इगतपुरी येथे इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न. नाशिक शांताराम दुनबळे. नाशिक-:जिल्हा परिषद शाळा गिरणारे ता इगतपुरी येथे स्थानिक आमदार निधी,समग्र शिक्षा अनुदान व एम्पथी फाऊंडेशन चेंबूर मुंबई यांच्या सयुंक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा गिरणारे येथे इमारती चा भूमिपूजन कार्यक्रम केंद्रप्रमुख राजाराम जाधव साहेब यांच्या शुभहस्ते , सर्व ग्रामस्थ व मुख्याध्यापक रावसाहेब विष्णू दुनबळे सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला .इमारतीची गुणवैशिष्ट्ये.वर्गखोल्या एकूण ४ मुख्याध्यापक कार्यालय १
संगणक कक्ष १ टॉयलेट मुली १ टॉयलेट मुले १
टॉयलेट अपंग विद्यार्थी १ *इमारतीसाठी जमलेला निधी*
मा. आमदार हिरामण खोसकर यांचेकडून आमदार निधी १० लाख रुपये .ग्रामस्थांची वर्गणी दोन लाख रु ,
शिक्षक वर्गणी 30 हजार रुपये ,
एम्पथी फाउंडेशन पन्नास लाख रुपये अल्पावधीतच शाळेत शिकणाऱ्या बालगोपाळांसाठी सुसज्ज अद्ययावत इमारत उभी राहील •इमारत बांधकाम तडीस नेण्यासाठी ग्रामस्थ, पदाधिकारी ,मा विधानसभा अध्यक्ष श्री झिरवाळ साहेब, आमदार हिरामण खोसकर साहेब, मा श्री राजेंद्र शहाडे (मुख्य अभियंता प्रकल्प महाराष्ट्र राज्य )मा.श्री भोकरे साहेब , सर्व ग्रामस्थ, आजी-माजी शिक्षक ,तरुण मित्र मंडळ या सर्वांचे सहकार्य लाभले असुन भूमिपूजन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close