ताज्या घडामोडी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मजूरवर्गावर उपासमारीची वेळ” “आम्हाला कोण वाली आहे का? मजुरांचा सवाल”!!!.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मजूरवर्गावर उपासमारीची वेळ" "आम्हाला कोण वाली आहे का? मजुरांचा सवाल"!!!.

 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मजूरवर्गावर उपासमारीची वेळ”
“आम्हाला कोण वाली आहे का? मजुरांचा सवाल”!!!.

हातावर पोटाची खळगी भरणाऱ्या मजूर वर्गाचे हाल….

ममदापुर/येवला:-येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जनजीवन ठप्प झाले असताना त्याचा सर्वात जास्त फटका बसला आहे, तो दैनंदिन मजुरी करणाऱ्या वर्गाला. रोजंदारीवर काम करायचे आणि मिळणाऱ्या मोबदल्यावर पोटाची खळगी भरायची.किराणा,धान्य आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी जवळ पैसा लागते.कामच नसल्यामुळे तो येईल कोठून.असा वर्ग येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात मोठ्याप्रमाणावर आहे. उन्हाळ्यात राजापूर, ममदापुर, देवदरी, सोमठाणे, रेंडाळे,कोळगाव,भारम, कोळम,सायगाव,राहाडी या भागात कितीही पाऊस झाला तरी जानेवारी महिण्यातच पाण्याचा खात्मा होत असतो या परिसरात उन्हाळ्यात नेहमीच पाण्याची टंचाई भासते. त्यामुळे या भागातील काही लोक शहराच्या ठिकाणी जाऊन काम धंदा करून मोलमजुरी करून आपली रोजी रोटी कमवत असतात. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन असल्यामुळे मोल-मजुरी काम कारणाऱ्यांची मोठी हालअपेष्टा सुरू आहे. त्यामुळे आम्हाला कोण वाली आहे का? असा सवाल हे मजूर करीत आहेत.
येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भाग दुर्गम आणि डोंगराळ असल्याने तालुक्‍यात नोकरीच्या संधी खूप कमी आहेत.त्यात दरवर्षीचा निसर्गाचा चाललेला लहरीपणा त्यामुळे रोजंदारीवर आपली उपजिविका करणारा वर्ग वाढला आहे. तालुक्‍यात अगदी गावागावात इमारत बांधकाम करणारे छोटे मोठे कंत्राटदार तयार झाले आहेत.त्यांच्याकडे रोजंदारीवर काम करणारा मजूर वर्गही मोठा आहे.

तालुक्‍यातील गावागावातील आठ-दहा लोक रोज अशा कामावर जाणारे आहेत. तालुक्‍यातील हजारो लोकांचे पोट भरणे व दैनंदिन जीवन जगविण्याचे काम हा व्यवसाय करत आहे. त्यामुळे गोरगरीबांचे पोषणकर्ते होण्याचे महान कार्य या कंत्राटदारांनी केले आहे. करोना विषाणूंचा कहर वाढल्याने सर्व जीवन ठप्प झाले आहे. इमारत बांधकामे बंद पडली आहेत. परिणामी या रोजंदारीच्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचा कोण विचार करणार आहे का? असा सवाल विचारला जात आहे.

येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील मोल-मजुरी करून आपली दोन वेळेची रोजी-रोटी कमावणाऱ्या मजुर वर्गाला दुष्काळी,अवकाळी आणि यावर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा चांगलाच फटका बसला आहे.त्यामुळे मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

देविदास गुडघे पाटील.
मराठा मावळा संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष
देविदास गुडघे

मराठा मावळा संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष

मो 9881969807

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close