आपला जिल्हा

दहा हजार नागरिकां का मागे एक ऑक्सिजन बेड का.‌? 45 दिवसात 202 नागरिकांचा बळीयाला जबाबदार कोण.?

दहा हजार नागरिकां का मागे एक ऑक्सिजन बेड का.‌? 45 दिवसात 202 नागरिकांचा बळी याला जबाबदार कोण.?

पोलीस टाईम्स प्रतिनिधी. अफरोज अत्तार

मनमाड शहर रेल्वे हॉस्पिटल येथील DCHC सेंटर मध्ये 30 बेड मंजूर असतांना,15 च बेड लावण्यात आले आहे,
मनमाड शहर DCHC सेंटर 30 बेड मंजूर असतांना,15 रुगणांवरच उपचार होत आहे,
कारण DCHC सेंटर येथे दोन ड्यूरा सिलेंडर असल्याने 15 च बेड लावण्यात आले आहे,
संबंधित अधिकारीचं म्हणणं आहे आम्ही जंबो सिलेंडर आणू तेव्हा 30 बेड पूर्ण सुरू करता येईल,तो पर्यंत 15 बेड लावण्यात आले आहे,

शहराची लोकसंख्या दिड लाखा पेक्षा जास्त अन DCHC सेंटरला 15 बेड, म्हणजे 10,000 नागरिका मागे एकच बेड देण्यात आले का,?

दिड लाखा पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरासाठी प्रशासनाने तात्काळ जंबो सिलेंडरची व्यवस्था करून DCHC सेंटरचे संपूर्ण 30 बेड सुरू करावे,

तसेच प्रशासनाने योग्य ती कारवाई करून संपूर्ण मनमाड शहरासाठी 120 ऑक्सिजन बेड लावण्याची गरज आहे,अन्यथा शहरात मृतांचा आकडा वाढल्या शिवाय राहणार नाही,

आम्ही माहिती अधिकारात माहिती घेतली आहे,

दि,04 मार्च ते 19 एप्रिल 2021 या 45 दिवसातच मनमाड शहरात 202 नागरिकांच मृत्यू झाला आहे,

सर्व सामान्य गोरगरीब नागरिकांच्या जीवाला “महत्व” नाही का.?

या दोनशे दोन (202) नागरिकांच्या बळीला संबंधित अधिकारीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये.?

भीमराज लोखंडे, कादिर शेख,

मनमाड बचाव जण आंदोलन,मनमाड

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close