ताज्या घडामोडी

*जवळा सेंट्रल बँकेत कर्मचार्‍याला मारहाण; दोन तास कामकाज बंद,ग्राहकांना नाहक त्रास* *सांगोला/विकास गंगणे*

*जवळा सेंट्रल बँकेत कर्मचार्‍याला मारहाण; दोन तास कामकाज बंद,ग्राहकांना नाहक त्रास*

*सांगोला/विकास गंगणे*

बँकेत सोशल डिस्टन्स ,कोरोना नियमांचे पालन करावे म्हणून सुचना देणारे कर्मचारी यांना मारहाण केल्याची घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे.
श्रीमंत भगवान लवटे या इसमाने बँकेतील कर्मचारी मारुती नवत्रे यांना मारहाण केली आहे.
जवळा येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत सोळा गावातील ग्राहकांचे व्यवहार आहेत. बँकेत दररोज मोठी गर्दी होत असते. कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे,जवळा व पुर्व भागातील सर्वचं गावामध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सेंट्रल बँकेच्या जवळा शाखेकडून ही कोरोना संसर्गाबाबत काळजी घेतली जात आहे. ग्राहकांची प्रचंड गर्दी होत असल्यामूळे बँकेतील दफ्तरी कर्मचारी मारुती बयाजी नवत्रे यांनी सर्वचं खातेधारकांना सोशल डिस्टन्स व कोरोनाचे नियम पाळण्याच्या सुचना वारंवार देत असताना एक खातेदार जाणीवपूर्वक सुचनांकडे दुर्लक्ष करत होता.त्याने तसेच न जुमानता बँकेत प्रवेश केला,कँशियर,क्लर्क यांनीही त्या व्यक्तिला समजावून सांगत बाहेर थांबा तुम्हाला आम्ही थोड्यावेळाने आत बोलवतो असे सांगितले असता हुज्जत घालण्यास सुरुवात केली असता उपस्थित मारुती बयाजी नवत्रे यांनी त्याला समजावून सांगत बाहेर थांबा असे सांगताच उलट मारहाण करण्यास सुरुवात केली व कानाखाली मारत खाली पाडले.यामुळे काही वेळ बँकेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
मारहाण करणार्‍या श्रीमंत भगवान लवटे या इसमास तात्काळ बँकेला कुलूप घालत कोंडून ठेवून काम बंद केले.
सांगोला पोलीस स्टेशनला तात्काळ घडलेल्या घटनेची माहीती मारुती बयाजी नवत्रे यांनी दिली. पोलीस येईपर्यंत बँकेतील कामकाज बंद ठेवले होते. घेरडी बीटचे हवालदार विकास बनसोडे यांनी घटनास्थळाची पाहणी करुन मारहाण करणार्‍या श्रीमंत भगवान लवटे या इसमास ताब्यात घेतले. गर्दीवरती नियंत्रण मिळवत खातेधारकांना शिस्त लावण्यासाठी बनसोडे यांनी पुढाकार घेऊन स्वत: सर्व खातेधारकांना टोकन दिले.
साधारणपणे दोन तास बँकेतील कामकाज बंद ठेवल्यामूळे खातेधारकांना ताटकळत बसत नाहक त्रास सहन करावा लागला.
जवळा व परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी असलेल्या या बँकेत सुरक्षा रक्षक असणे अत्यंत गरजेचे आहे. अगदि मुख्य रस्त्यावरती असलेल्या या बँकेंत एखादी दुर्घटना जर घडली तर त्याला कोण जबाबदार.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close