आरोग्य व शिक्षण

येवला तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणाला प्रारंभ

येवला तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणाला प्रारंभ

दि. २८/०४/२०२१ ते ०२/०५/२०२१ या कालावधीत येवला तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा प्रारंभ झाला आहे.

मा. छगन रावजी भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र शासन यांनी आढावा बैठकीत दिलेल्या सुचनेनुसार तालुक्यातील एकही व्यक्ती सर्वेक्षणाविना राहता कामा नये.

तसेच मा. सोपान जी कासार, उपविभागीय अधिकारी येवला यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुक्यात तहसीलदार प्रमोद जी हिले, अधिकारी डाॅ.उमेश जी देशमुखृव तालुका आरोग्य अधिकारी यांचे नेतृत्वाखाली तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला प्रारंभ झाला आहे.

येवला तालुक्यातील १२४ गावांमध्ये ३२२ पथकातील ९८६ सदस्यांव्दारे हि मोहिम राबविली जात आहे.

या मोहिमेत तालुक्यातील सुमारे ४६३२९ कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार असून त्यामध्ये शिक्षक, अंगणवाडी सेविका व आशा सेविका घरोघरी जावून प्रत्येक व्यक्तीचे ऑक्सीजन व ताप याचे मोजमाप केले जाते कोमॉर्बिड व्यक्तीची चाचणी करण्यासाठी प्रस्तावित करण्यात येते.

यामुळे तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णांवर नियंत्रण राखण्यास मदत होईल.

आज दि. २९/०४/२०२१ तहसीलदार प्रमोद हिले यांनी चिचोंडी व एरंडगांव बुद्रुक येथे भेट देऊन कामकाजाची पहाणी केली. पथकाला मार्गदर्शन केले. यावेळी श्री. जालिंदर गावडे, शिक्षक, श्रीम. कविता पडोळ, अंगणवाडी सेविका, श्रीम. छायाबाई गोसावी आशा कार्यकर्त्या, श्री. योगेश उराडे, ग्रा.पं. शिपाई व श्री. कमलेश निर्मळ, तलाठी एरंडगांव बु. उपस्थित होते.

हसीलदार येवला  प्रमोद हिले यांचे प्रामुख्यांने सदर मोहीम यिशस्वी करण्यासाठी विषेश परीश्रम घेत आहेत असे पोलीस टाईम्स न्युज च्या निदर्शनात आले 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close