आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

इनरव्हील क्लब ऑफ कर्जत यांच्याकडून गरजूंना अन्य धान्याचे वाटप

कोरोना योध्या म्हणून बाली परदेशी यांचा इनरव्हील क्लब ऑफ कर्जत तर्फे सन्मान करण्यात आला

इनरव्हील क्लब ऑफ कर्जत यांच्याकडून गरजूंना अन्य धान्याचे वाटप

नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर ….इनरव्हील क्लब ऑफ कर्जत

कोरोना योध्या म्हणून बाली परदेशी यांचा इनरव्हील क्लब ऑफ कर्जत तर्फे सन्मान करण्यात आला

आकुर्ले :. विजय डेरवणकर

इनरव्हील क्लब ऑफ कर्जत यांच्या वतीने बुधुवार दिनांक 28 रोजी काही गरजू नागरिकांना अन्य धान्याचे वाटप केले तर कोरोना काळात आपल्या जीवाची परवा न करता निःस्वार्थी पणे काम करणाऱ्या सा. ग. म. मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते बाली परदेशी यांचा इनरव्हील क्लब ऑफ कर्जत यांच्या कडून शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला

इनरव्हील क्लब ऑफ कर्जत या संस्थेच्या फाउंडर मोनिका बडेकर आहेत यांनी ही संस्था 2017 मध्ये स्थापन केली या संस्थेचे नेहमीच निःस्वार्थी पणे सामाजिक सेवा चालू असते

इनरव्हील क्लब ऑफ कर्जत ही संस्था महिलांची असून नेहमीच सामाजिक कार्यात मदतीचा हात पुढे करीत आहेत याच्या अध्यक्षा प्राची चौडिये उपाध्यक्ष अवंतिका गायकर सेक्रेटरी उत्तरा वैद्य खजिनदार करुणा पराडकर मोनिका बडेकर तन्वी जोशी शीला गुप्ता साक्षी अडसुळे वैशाली दांडेकर पुनम मुसळे आदी महिला आहेत या संस्थेने वेळोवेळी सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन आपला ठसा उमटवला आहे कर्जत

तालुक्यातील आदिवासी वाड्या पाड्यांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविल्या आहेत लॉकडाऊन मध्ये कित्येक गरजूंना अन्य धान्याचे वाटप केले तर ज्या महिलांनी लॉकडाऊन मध्ये गरजूंना जेवणाचे डबे पुरविले तसेच मास्कचे वाटप केले आशा महिलांचे इनरव्हील क्लब ऑफ कर्जत यांच्या वतीने त्या महिलांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले असे एक ना अनेक सामाजिक कार्य या संस्थेने केले आहेत

याप्रसंगी अध्यक्षा प्राची चौडिये , सेक्रेटरी उत्तरा वैद्य ,मोनिका बडेकर ,करुणा पराडकर ,तन्वी जोशी ,सुलोचना गायकवाड ,शिल्पा दगडे , वनिता सोनी ,पल्लवी सावंत ,सुप्रिया गिरी ,आदी इनरव्हील क्लब ऑफ कर्जत या संस्थेच्या महिला उपस्थित होत्या

————————————

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close