महाराष्ट्र

विक्रम फाऊंडेशन व दत्त पतसंस्थेच्या वतीने कोविड रुग्णालय उभा करणार:आमदार विक्रमदादा सावंत

पोलीस टाईम्स न्युज विजय तिकोटी सांगली जिल्हा प्रतिनिधी

विक्रम फाऊंडेशन व दत्त पतसंस्थेच्या वतीने कोविड रुग्णालय उभा करणार:आमदार विक्रमदादा सावंत
जत:प्रतिनिधी:कोरोणाच्या पार्श्वभूमीवर विक्रम फाऊंडेशन व दत्त सहकारी पतसंस्थेच्या वतीने कोविड रुग्णालय उमदी व डफळापूर येथे उभा करणार असल्याची माहिती आमदार आमदार विक्रमदादा सावंत यांनी दिली.
आमदार सावंत यांनी उमदी येथे कोविड रुग्णालयासाठी जागेची पाहणी केली. तसेच उमदी येथील स्थानिक डॉक्टरांची बैठक घेतली.यावेळी आमदार सावंत,विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम,रोहन चव्हाण,तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर,डॉ.हत्तळ्ळी,डॉ.मदगोंड, डॉ. लोणी,डॉ.हिरेमठ आदी उपस्थित होते.यावेळी आमदार सावंत म्हणाले की,कोरोनाचा वाढता प्रसार पाहता विक्रम फाऊंडेशनच्या वतीने उमदी येथे ४० ऑक्सीजनयुक्त बेडचे रुग्णालय सुरू करण्याचा मानस आहे.सर्व औषधोपचार,डॉक्टरांना आवश्यक असणारे पीपीई किट,मास शिल्ड आदी सर्व उपयोजना या ठिकाणी होणार आहेत.तसेच रुग्णांना चहा व नाष्टा या सोयी उपलब्ध होतील.माणुसकीच्या दृष्टीकोनातून उमदी येथील सर्व डॉक्टरांनी संभाव्य रुग्णावर उपचार करावेत असे आवाहन आमदार सावंत यांनी करताच डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करण्याची ग्वाही दिली. त्याचप्रमाणे डफळापूर येथे श्री दत्त ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या वतीने ४० बेडचे कोविड रुग्णालय उभे करणार आहे.
विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम म्हणाले की,विक्रम फाऊंडेशनने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे.आमदार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी येथे कोविड रुग्णालय उभे करणार असून येथील डॉक्टरांनी रुग्णसेवा करण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच सहकारी पतसंस्था ,सेवा भावी संस्थानी मदत करावी.डफळापूर व उमदी येथे येत्या चार-पाच दिवसात उभे करण्यात येईल.
पोलीस टाईम्स न्युज
विजय तिकोटी
सांगली जिल्हा प्रतिनिधी

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close