ताज्या घडामोडी

सांगोला शहरात शिवभोजन थाळीचा कार्यक्रम सुरळीत

*सांगोला/विकास गंगणे*

:- मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार सांगोला शहरात शिवभोजन थाळीचा कार्यक्रम सुरळीत चालू आहे संचार बंदीच्या काळात दररोज मोफत ७० ते ८० गरजू लोक भोजनाचा लाभ घेत आहेत. अंबिका महिला बचत गटामार्फत लोकांना अत्यंत चांगल्या प्रकारे चविष्ट जेवण दिले जात आहे. लवकरच सांगोला शहरात शिव भोजन थाळीचे दुसरे केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न प्रशासन करणार आहेत

सांगोला पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक भगवान निबाळकर साहेब यांनी बुधवारी सांगोला शहरातील महाराष्ट्र शासनामार्फत अंबिका महिला बचत गटातर्फे चालविल्या जाणाऱ्या शिव भोजन थाळी केंद्रास भेट देऊन माहिती घेतली. यावेळी पो.नि निबाळकर यांनी गरीब लोकांना चांगल्या प्रकारे भोजन देत असल्याबद्दल बचत गटाचे कौतुक केले

कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे प्रशासनाकडून सांगोला शहर व तालुक्यात कडक संचारबंदी लागू केली आहे.त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील आस्थापना वगळता सर्व उद्योग , व्यवसाय बंद असून हातावरची पोट असणाऱ्या गोरगरिबांना एक वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे ही गरज ओळखून महाविकासआघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब व गरजू लोकांना मोफत शिवभोजन थाळी वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. त्यानुसार सांगोला शहरातील अंबिका महिला बचत गटामार्फत दररोज दु.१२ ते ३ या वेळेत मोफत शिवभोजन थाळी वाटप करुन गोर- गरीबांची भुक भागविली जात आहे. गत एप्रिल महिन्यापासून अंबिका महिला बचत गटामार्फत शिव भोजन थाळी कार्यक्रम राबवला जात आहे गतवर्षी एप्रिल महिन्यापासून हजारो लाभार्थ्यांनी या शिवभोजन थाळीचा मोफत लाभ घेतल्याचे बचत गटाच्या अध्यक्षा हिरकण पाटील यांनी सांगितले यावेळी सचिव सुमन राजमाने व सहसचिव दिपाली पाटील सोमा पाटील तात्या पाटील उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close