ताज्या घडामोडी

नागरीकांनी विनाकारण फिरु नये- अशोक करताडे, तंटामुक्ती अध्यक्ष डिकसळ,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष

*नागरीकांनी विनाकारण फिरु नये-
अशोक करताडे, तंटामुक्ती अध्यक्ष डिकसळ,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष

*सांगोला/विकास गंगणे*

-सध्या कोरोनाने जगात दुसर्यांदा थैमान घातले असून,कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनी विनाकारण फिरु नये,नागरीकांनी घरी राहूनच, प्रशासनास सहकार्य करावे ,कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून कठोर पाऊले उचलली असताना काही बेजाबदार व मोकाट पणे फिरणार्या लोकामुळे त्यांच्या स्वताबरोबरच इतरांच्या जिवनाशी खेळ सुरू केल्याने पोलिस आणि प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. अशा या मोकाट पणे वावरणार्या लोकामुळे सर्वसामान्यमध्ये चिंता व्यक्त होत आहे.कोरोना या विषाणू रोगावर नियंत्रण मिळवून त्याला हद्दपार करण्यासाठी शासन कडक नियम करीत आहे,तरी या नियमाला काही नागरीक शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत.तसेच बाहेरून आलेल्या लोकांनी १५ दिवस बाहेर न फिरता घरातच थांबावे,तरीही काही बाहेरून आलेले लोक स्वताच्या जिविताबरोबरच बाहेर मोकाट फिरून इतरांच्या जिवातीस देखील धोका निर्माण करीत आहेत.या प्रशासनावर मोठा ताण पडत आहे.प्रशासनाने दिलेले आदेश व सुचना या केवळ जनतेसाठीच असल्याने त्यांच्या जिवातीच्या रक्षणासाठी असल्याने प्रत्येकाने स्वताची जबाबदारी म्हणून घरात थांबूणे बंधनकारक आहे. असे न करता मोकाटपणे वावरणार्या अशा लोकांना कठोर शासन देऊन अद्दल घडवणे गरजेचे आहे,असे अवाहन डिकसळ गावचे राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अशोक करताडे यांनी अवाहन केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close