ताज्या घडामोडी

घेरडी केंद्रातील अधिकार्यांचा मनमानी कारभार,वरीष्ठांनी लक्ष देण्याची गरज*

वरिष्ठांकडे लेखी तक्रार करणार- चंद्रकांत करांडे.....सरपंच डिकसळ*

*घेरडी केंद्रातील अधिकार्यांचा मनमानी कारभार,वरीष्ठांनी लक्ष देण्याची गरज*

*वरिष्ठांकडे लेखी तक्रार करणार- चंद्रकांत करांडे…..सरपंच डिकसळ*

*सांगोला/विकास गंगणे*

.सोमवार दि.२६ एप्रिल रोजी लसीकरणाच्या दोन बोटल डिकसळ मध्ये आल्या,परंतू प्रत्येक्षात लाभार्थी ६० ते ७० आले,यामध्ये डिकसळ ,पारे,नराळे व हबिसेवाडी गावाचा समावेश आहे,परंतू आरोग्य सेवक अभिमन्यू शिंदे यांनी घेरडी केंद्रातून लस आणली ,पण या लस टोचणीसाठी काही वेळ कोणीही आरोग्य सेविका उपकेंद्रात आली नाही ,लस टोचणी साठी आलेल्या काही नागरीकांना विनाकारण ताटकळत बसावे लागले,नागरीकासाठी लस टोचणी शासनाने सोमवार व मंगळवार या दोन दिवस ४५ वर्षावरील लस टोचणीसाठी दोन दिवस दिले आहेत,परंतू लस असून अडचण,नसून खोळंबा या घेरडी केंद्रांतील अधिकार्याच्या मनमानी कारभारामुळे.कोरोनाने जगात थैमान घातले असून ,तरी काही मनमानी अधिकार्यांनी नागरीकांच्या जिवाशी थैमान घालू नये ,तरी या कोरोनाच्या काळात तरी आरोग्य विभागातील अधिकार्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजवावी.सोमवारी दि.२६ रोजी,लस मिळाली परंतू एका आडमुट्टी सुपरवायझर यांनी नाही तो प्रकार केला.विनाकारण काही लाभार्थांना काही वेळ उन्हामध्ये बसावे लागले.तरी हा डिकसळ येथे लस टोचणी वेळी झालेल्या अधिकार्यांचा मनमानी कारभार सहण केला जाणार नाही,याती काही कर्मचार्यांचा मनमानी कारभार असून,याची तक्रार,जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रयमामा भरणे,जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ.शितलकुमार जाधव यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे डिकसळ गावचे सरपंच चंद्रकांत भिमराव करांडे यांनी सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close