आरोग्य व शिक्षण

येवला तालुक्यात बोकटे,देवळणे,दुगलगाव येथे कोरोनाचा कहर…* अंदरसुल प्रतिनिधी हितेश दाभाडे

*येवला तालुक्यात बोकटे,देवळणे,दुगलगाव येथे कोरोनाचा कहर…*

अंदरसुल प्रतिनिधी
हितेश दाभाडे

येवला तालुक्यातील बोकटे,देवळाणे,दुगलगाव येथील कोरोनाचे खाजगी मधील चाचणी वगळता एकूण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण संख्या बोकटे येथील शासकीय यादी प्रमाणे ३२ तर ३ रुग्ण खाजगी आणि देवळणे येथील १५,दुगलगाव येथील ३,अजूनही काहींनी चाचणी केल्यास आणखी रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याने बोकटे,देवळाणे, दुगलगाव येथील कोरोना नियंत्रण समितीने वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोना चा संसर्ग वाढु नये म्हणून ‘ब्रेक द चैन’ अंतर्गत पुन्हा गाव बंदचा निर्णय घेतला आहे.म्हणूनच सोमवार दिनांक २६ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपासून ते १ मे संध्याकाळ १२ वाजेपर्यन्त सर्व दुकाने त्यात वेल्डिंग काम,सुतारकाम काम, कृषिसेवा,टेलरकाम,कापड दुकाने,हार्डवेअर,आधार सेंटर,पिठाच्या गिरण्या आणि संसर्ग वाढवणारे सर्व व्यवसाय १ मे पर्यंत शासनाच्या वतीने कोरोना समिती अंतर्गत पूर्णतः बंद करण्यात येत आहे.तसेच बोकटे,देवळाणे,दुगलगाव येथील पेशंट हे जास्त प्रमाणात वस्तीवरील असून जास्तीतजास्त जास्त शेतकरी वर्ग आहे,आणि ते बरीच शेतकरी जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करतात व ते दूध डेरिस देण्यासाठी सर्व बोकटे देवळाणे, दुगलगाव येथील दूध संकलन केंद्रात एकत्र येतात म्हणून त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून ‘ब्रेक द चैन’ अंतर्गत दूध संकलन एक टाईम म्हणजे सकाळीसच चालु असणार आहे.मात्र संकलन सुरू ठेवतांना सर्वानी दूध संकलन करणारा आणि दूध देणारा शेतकरी यांच्याकडे निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच दूध घेता येईल, व देता येईल असा निर्णय कोरोना समितीने घेतला आहे.त्यासाठी २ दिवसाची मुदत देण्यात आली आहे,२ दिवसात सर्वानी आपले रिपोर्ट काढून घ्यावे अश्या सुचना दूध संकलन केंद्रचालकांना व दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत.अन्यथा २ दिवसानंतर रिपोर्ट नसल्यास दूध स्विकारु नये अश्या सक्त सूचना कोरोना नियंत्रण समितीने दिल्या आहेत.तसेच अजूनही रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता असल्याने कोणीही आपले घर सोडून शेजार च्या वस्तीवरही जाऊ नये.असे आव्हान कोरोना समितीने केले आहे.तसेच बोकटे,देवळणे,दुगलगाव येथील सरपंच व आरोग्य अधिकारी अंदरसुल डॉ तारुर यांच्या संयुक्त विद्यमाने बोकटे येथे कोविड लसीकरण व चाचणी शिबीर आयोजित करण्यात आले होते मात्र त्या वेळेस ४५ वयाच्या पुढील फक्त ६० लोकांनाच लस दिली गेली मात्र तिन्ही गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक ग्रामस्थ लसीकरणा पासून वंचीत राहिले,म्हणूनपुन्हा शिबीर घ्यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य महेंडे काले,बोकटे येथील सरपंच प्रताप दाभाडे,ग्रामसेवक भाऊराव मोरे यांना ग्रामस्थ करत आहेत.

प्रतिक्रिया

जिल्हापरिषद सदस्य महेंद्र काले यांनी ग्रामस्थांना आवाहन केले की,कोरोना हा विषाणू अदृश्य असून शासनाच्या वतीने विविध उपाय योजना सुरू आहे.मी स्वतः गंभीर परिस्थितीत असतांना शक्य तेवढे पेशन्टच्या मदतीसाठी सर्वे सर्व प्रयत्न करत आहे,मात्र प्रत्येकाने आपली काळजी,आपल्या कुटुंबासाठी तरी घेणे गरजेचे आहे.कोरोनाचा योग्यवेळी उपचार झाल्यास निश्चित बरा होतो.म्हणून प्रत्येकाने न घाबरता लक्षण आढळून आल्यास,आणि कुटुंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह असल्यास त्वरित चाचणी करून घेणे गरजेचे आहे,व पॉझिटिव्ह व्यक्तीने स्वतः विलगीकरणात राहिले पाहिजे.परीसरातील ग्रामस्थांचे त्वरित कोविड लसीकरण व्हावे म्हणून एच.डी.ओ.कपील आहेर यांच्याकडे मी मागणी केली आहे.व त्यानी त्वरित शिबीर घेण्यात येईल असे आश्वासनही दिले आहे. म्हणून सद्यस्थितीत तरी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांसह ग्रामस्थ यांनी सहकार्य कराव,अशी त्यांनी या वेळी विंनती केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close