ताज्या घडामोडी

अंबाडी नाका येथील डायमंड वाईन शॉप या दुकानात टाळेबंदी नियम मोडून मद्यविक्री सुरू असलेले बाबत.

e

प्रति,
मान.पोलीस निरीक्षक
गणेशपुरी पोलीस ठाणे
ता.भिवंडी ,जि. ठाणे
महाराष्ट्र

विषय- अंबाडी नाका येथील डायमंड वाईन शॉप या दुकानात टाळेबंदी नियम मोडून मद्यविक्री सुरू असलेले बाबत.

महोदय,
सरकारने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळे बंदी जाहीर केली आहे. या आदेशानुसार नुसार आपण अत्यंत तळमळीने स्वतः पोलीस वाहनातून फिरून सगळी दुकाने, आस्थापना, छोटे मोठे गरीब, आदिवासी, शेतकरी भाजी विक्रेता यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सगळ्या हद्दीत सर्व काही बंद आहे.

मात्र अंबाडी नाका बाजारात असलेले डायमंड वाईन शॉप हे दुकान अत्यंत राजरोसपणे दररोज दुकानातून मद्य विक्री करत आहे, परवा याबाबत काही स्थानिक महिलांनी विरोध केलेला तेव्हा आपले पोलीस जागेवर गेले आणि कायदा सुव्यवस्था राखली. पण आता जनतेला दिसायला लागले आहे, की आम्ही भाजी, दुकान, टपरी मध्ये 200- 500 रुपयांचे सामान विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना आदेश येताच सगळे बंद केले. मग या वाईन शॉप ला होम डिलिव्हरी चा आदेश असताना असे खुली सुट कशी मिळत आहे.?

जनतेचा संताप वाढत आहे, कोरोना महामारी मध्ये असे प्रकार हे निंदनीय आहेत. पोलीस हे वाईन शॉप बंद नसतील करत तर जनता आक्रोश होण्याची शक्यता आहे आणि ते आम्हाला सुजाण नागरिकांना नको आहे. या बेकायदेशीर कृत्याला विरोध करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना दम दाटी आणि दहशत दाखविण्यासाठी वाईन शॉप मालकाने बाऊन्सर आणले आहेत, त्यांची ही चौकशी करता आली तर करावी. टाळेबंदी मध्ये बाहेरचे लोक इथे कसे???

म्हणून आम्ही आपणांस विनंती करतो की तातडीने हा वाईन शॉप पूर्णपणे बंद करावा. तसेच त्याच्यावर टाळेबंदी आदेश मोडल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा, ही विनंती.

आणि तो आपल्या आदेशाचे पालन करत नसेल तर कृपया तसे कळवावे, ही विनंती.

आपले,

प्रमोद पवार कल्पेश (बाळू) जाधव
आणि अंबाडी नाक्यावरील सुजाण आणि कायदा पाळणारे नागरिक.

दिनांक-24 एप्रिल 2021
प्रत: मान.मुख्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य
मान.गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य
मान.पोलीस अधीक्षक ,ठाणे ग्रामीण
मान.उपविभागीय अधिकारी गणेशपुरीभिवंडीमधील अंबाडी नाका येथील डायमंड वाईन शॉप या दुकानात टाळेबंदी नियम धाब्यावर बसवून मद्यविक्री सुरू आहे. कारण याठिकाणी वाईन शॉप मालकाने आपल्या ताकदीच्या बळावर राजरोसपणे दारू विकण्याचा धंदा सुरु ठेवला आहे. येथील जनतेच्या मनात एकच प्रश्न पडला आहे तो सामान्यांसाठी एक न्याय व वाईन शॉप साठी वेगळा न्याय का ? या गोष्टीची दखल स्थानिक प्रशासन घेणार आहे का ? व योग्य ती कारवाई करणार आहे का ? याच प्रतीक्षेत आहे.
यासाठी त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशन (गणेशपुरी पोलीस स्टेशन) तसेच राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस अधीक्षक ,ठाणे ग्रामीण व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेशपुरी यांच्याकडे न्यायाची अपेक्षा करीत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close