आरोग्य व शिक्षण

लातूरला ऑक्सिजन सुरक्षित आणण्यासाठी औशाचे नायब तहसीलदार कानडेचे पथक पोहचले बेल्लोरीला

लातूरला ऑक्सिजन सुरक्षित आणण्यासाठी
औशाचे नायब तहसीलदार कानडेचे पथक पोहचले बेल्लोरीला

औसा प्रतिनिधी

बेल्लोरी येथून सुरक्षित ऑक्सिजन आणण्यासाठी औसा तहसील कार्यालयात कार्यरत असलेले नायब तहसीलदार सुभाष कानडे सर हे बेल्लोरी येथे पोहचून त्यांनी ऑक्सिजन चा टँकर लातूरला आणण्याचे कर्तव्य पोलिसांच्या मदतीने पार पाडले.
महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा होऊन आणि बेड न मिळण्याच्या कारणाने हजारो नागरिकांचा दिवसाला बळी जात असल्याच्या घटना घडत आहेत यामुळे मानवी जीवनावर मोठा परिणाम झाला असून शासकीय सेवेतील कर्मचारी यांना आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडावे लागत आहे.या कर्तव्य पार पाण्यामध्ये पाण्यामध्ये आरोग्य विभाग,पोलिस प्रशासन,महसूल प्रशासन हे विभाग अग्रेसर असून दि 21 एप्रिल 2021 रोजी औशाचे नायब तहसीलदार सुभाष कानडे यांनी आपले कर्तव्य बजावत असताना बिल्लोरी येथून लातूर साठी येणारे ऑक्सिजनचे दोन टँकर हे नुकतेच सुरक्षितरित्या घेऊन ते दि 22 एप्रिल 2021 रोजी लातूरला सुरक्षित स्थळी पोहचंले आहेत. यामुळे लातूर येथील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाला असून अनेकांचे प्राण यामुळे वाचणार आहेत.

———————————-

18 टन लिक्विड भरलेली ऑक्सीजनची गाडी लातूर पोलिसांचे पथक घेऊन घेऊन पथक घेऊन घेऊन नायब तहसीलदार सुभाष कानडे यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक पासून सोबत होते, प्रशासनाच्या दोन दिवसाच्या अथक मेहनतीने हे टँकर सतत लोकेशन टाकत लातूरला संपर्कात राहून सुरक्षितपणे लातूर येथे आणण्यात आले,
या टँकरचे चालक संदीप कदम राहणार वेरुळ जिल्हा औरंगाबाद यांच्या वडिलांच्या निधनाची वार्ता रस्त्यामध्येच मिळाली होती तरीही संदीप यांनी गाडी कोठेही न थांबविता गाडी लातुरात पोहचं करून तो चालक घराकडे रवाना झाला. त्याच्या देशसेवेला लातूरकरांचा सलाम आणि त्याच्या सोबत लातूर करांच्या संवेदना आहेत अशा प्रतीक्रिया नागरिकांतून मिळाल्या आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close