आपला जिल्हा

सावाद कोविड सेंटर येथे 24 चे स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट तयार करणार- पालकमंत्री एकनाथ शिंदे*

श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार यांनी मांडलेल्या व्यथे नंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयात तीन तास बैठक*

*सावाद कोविड सेंटर येथे 24 चे स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट तयार करणार- पालकमंत्री एकनाथ शिंदे*

*श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार यांनी मांडलेल्या व्यथे नंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयात तीन तास बैठक*

*1 मे पासून सावाद कोविड सेंटर पूर्ण तातडीने सुरू होण्यासाठी कालबद्ध नियोजन*

*रुग्णांची विचारपूस आणि ऍडमिशन प्रक्रियेसाठी स्वतंत्र हेल्पलाईन आजपासून सुरू*

*गणेशपुरी कोविड सेंटर तातडीने सुरू करण्याचे निर्देश*

सुहास पांचाळ / पालघर

ठाणे/ 22 एप्रिल : दोन दिवसांपूर्वी श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार यांनी भिवंडी कोविड सेंटर मधील रुग्णांच्या समस्या आणि नाकारलेला उपचार याबाबत एक व्हिडिओ केलेला. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. आज या पार्श्वभूमीवर आज तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक पार पडली. तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकित केवळ सावाद कोविड सेंटरवर चर्चा झाली. या ठिकाणीं येणाऱ्या अडचणी आणि नियोजनातील त्रुटींवर मार्ग शोधण्याचा प्रयत्न झाला. ऑक्सिजन पुरवठा आता होतो यापेक्षा दुपटीने करून सोबतच येत्या 1 मे पासून स्वतंत्र 12 टन क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट सावाद याठिकाणी सुरू करण्याबाबत पालकमंत्री यांनी अश्वासित केले. हाच प्लांट लगेचच 24 टन करण्याबाबतचे आदेशही त्यांनी संबंधित ठेकेदाराला दिले.

आज सकाळी श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे, आरोग्य सभापती कुंदन पाटील आदींनी सावाद कोविड सेंटर येथे भेट देत पाहणी केली, अधिकारी आणि डॉक्टर यांच्याशी चर्चा केली। नियोजन त्रुटी जाणवल्या, येथून जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कॉल केला, त्यांनी जिल्हाधिकारी यांना कॉल करून तातडीने याबाबत बैठक बोलावली.

या बैठकीत सावाद या ठिकाणी टप्प्या टप्प्याने बेड कार्यान्वित करून 818 चे 1000 बेड करून पूर्ण ताकदीने हे सेंटर सुरू करण्याबाबत आज नियोजन करन्याय आले. ।याठिकाणी यापुढे ऍडमिशन प्रोसेस पूर्णपणे जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांची टीम बघेल असे ठरले. ऍडमिशन आणि रुग्ण चौकशी साठी 2 स्वतंत्र संपर्क क्रमांक आज जारी करण्यात आले, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे।

जिल्हाधिकारी डॉ.राजेश नार्वेकर यांनी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू केलेल्या बेड उपलब्धता डेस्क बद्दल महिती दिली. येथील हेल्पलाईन वर संपर्क केल्यास जिल्हयात कुठे बेड उपलब्ध होईल याबाबत सहायता होईल असे त्यांनी सांगितले.

गणेशपुरी कोविड सेंटर चा प्रश्न यावेळी प्रमोद पवार यांनी उपस्थित केला. गणेशपुरी कोविड सेंटर तातडीने सुरू करण्याचे आदेश यावेळी पालकमंत्री यांनी दिले।तिथे लागणाऱ्या ऑक्सिजन ची व्यवस्था झाली असल्याची माहिती जिल्हा शक्य चिकित्सक पवार यांनी दिली. ऑक्सिजन लाईन बसविण्याचे काम पूर्ण होताच ते सेंटर सुरू होईल असे त्यांनी सांगितले

शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी यावेळी कोविड रुग्ण दाखल करताना काय त्रास होतो याचा तपशील मांडला, आरोग्य सभापती कुंदन पाटील यांनीही त्यांना आलेले अनुभव मांडत ही परिस्थिती सुधारण्यासाठी पाठपुरावा केल्याचे सांगितले.

एकूणच ही बैठक अत्यंत सकारात्मक पद्धतीने पार पडली .या बैठकीत ठरल्या प्रमाणे कार्यवाही झाली तर या कोविड संकटात दिलासा मिळेल एवढे नक्की. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी दिलेल्या शिकवणी प्रमाणे या संकट काळात आम्ही प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहोत असे यावेळी प्रमोद पवार यांनी अश्वसित केले.

आमदार शांताराम मोरे यांनी यावेळी आपल्या आमदार निधीतून पोर्टेबत ऑक्सिजन सिलेंडर साठी 50 लक्ष तर कर्डीक ऍक्बुलन्स साठी 25 लक्ष निधी खर्च करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना पत्र दिले.

यावेळी बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी डॉ राजेश नार्वेकर्, उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर ,जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, जिल्हापरिषद अध्यक्षा सुषमा लोणे, आरोग्य सभापती कुंदन पाटील, श्रमजीवी संघटना प्रवक्ते प्रमोद पवार, जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ.पवार, सह. जिल्हा चिकित्सक डॉ.प्रसन्न देशमुख, वन रुपी क्लिनिक चे डॉ. राहुल घुले, बाबासाहेब गोसावी,रुपेश जाधव, शैलेश पाटील इत्यादी सहभागी होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close