आरोग्य व शिक्षण

दीड कोटी खर्च करून तयार केलेले गणेशपुरी कोविड सेंटर कधी सुरू करणार?* *प्रमोद पवार*

*दीड कोटी खर्च करून तयार केलेले गणेशपुरी कोविड सेंटर कधी सुरू करणार?* *प्रमोद पवार*

सुहास पांचाळ / पालघर

गणेशपुरी /21.04. : ठाणे जिल्ह्यात आपल्या सर्वांच्या सुस्त स्वभावामुळे राज्यकर्ते आणि शासनकर्ते मनमोकळा अत्याचार करत आहेत. काल जसे शेलार पाडा येथील रुग्ण नाकारला तसा आज झिडके येथील पेशंट सुद्धा सावाद कोविड सेंटर ने नाकारला. आज तर चक्क *ऍडमिशन फुल* असा बोर्डच लावला.

गणेशपुरी कोविड केअर सेंटर मागच्या वर्षी सुमारे दीड कोटी रुपये खर्च उभारले, आज पर्यंत हे सेंटर धूळ खात पडले आहे. याबाबत अत्यंत बेजबाबदार धोरण वापरले जात आहे.

*कोविड च्या भयाण संकटातही भ्रष्टाचार सुरूच*

सावाद कोविड सेंटर चा व्यवस्थापनाचा ठेका देण्यातही गौडबंगाल आहे. जर आता ठेका दिलाय त्या कंपनीकडे पुरेसा मनुष्यबळ आणि यंत्रणा नाही तर त्यांना ठेका का दिला?

मुळात हा ठेका काही अनुभवी डॉक्टर घेत होते, पण 1 ते दीड कोटी अधिक रक्कमेचा हा ठेका आता दिला आहे. जे लोक 85- 90 च्या खाली ऑक्सिजन असलेले पेशंट घेतच नाही. म्हणजे फक्त एक प्रकारे विलगिकरण कक्ष चालवत आहेत.

भिवंडीचे खासदार श्री कपिलजी पाटील यांनी मला आज कालच्या व्हायरल व्हिडीओ बाबत कॉल केला. त्यांच स्पष्ट सांगितले की माझेही कॉल हे जिल्हाधिकारी किंवा इतर जबाबदार उचलत नाही. मी सुद्धा मागणी करून ,पत्रव्यवहार करून हैराण आहे, ऑक्सिजनसाठी मी पण प्रयत्न करते असे त्यांनी सांगितले. गंभीर बाब म्हणजे जर केंद्रात सत्ता असलेल्या पक्षाचे खासदार असलेल्या व्यक्तीला हे अधिकारी जुमानत नाही तर सामान्य जनतेचे काय?

खासदार महोदयांनी स्वतःच्या ताकदीने स्वतःच्या खर्चाने भिवंडीत कोविड केअर सेंटर उभारावे (एखाद्या रिकाम्या गोडाऊनच्या जागेत शक्य आहे) अशी कल्पना मी त्यांना सांगितली. परवानगी मिळाली तर मी असे करायला तयार आहे असे त्यांनी सांगितले. हे प्रत्यक्षात आले तर त्यांचे कैतुकच असेल.

पण प्रश्न असा आहे की *आता* काय?

रेमडीसीविर आजही लोक ब्लॅक ने घेतात, रोज शेकडो कॉल इंजेक्शनसाठी येतात।

आपण काहीच न बोलता केवळ आपल्या जवळच्या मरणाऱ्या लोकांचे *भावपूर्ण श्रद्धांजली* संदेश टाकून फक्त फ़ोटो स्टेटस ला टाकून दुःख व्यक्त करतो.

केवळ इतक्याने हे प्रश्न सुटतील का? असं वाटतं.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close