ताज्या घडामोडीसांस्कृतिक

आपण सर्वांनी आज दाखवून दिलं की जे काही सो कॉल्ड लोक समजत होते की, हे लोक आंबेडकर जयंती म्हणजे दारू पिऊन धिंगाणा घालून साजरी करतात!

*भारती धिंगान (प्रतिनिधी* )

आपण सर्वांनी आज दाखवून दिलं की जे काही सो कॉल्ड लोक समजत होते की, हे लोक आंबेडकर जयंती म्हणजे दारू पिऊन धिंगाणा घालून साजरी करतात! असा समज असणाऱ्या घाणेरड्या प्रवृत्तीच्या लोकांच्या मुस्काटात चपराक लगावली असून आज परत एकदा सर्व भिमाच्या सैनिकानीं दाखवून दिलं की ही जनता असेल गरीब,भोळी , भाबडी,भावनिक परंतु ती विचारांची पक्की आहे! आणि फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या विचारां वर च चालणारी आहे. आणि बाबासाहेबांच्या विचारां वर चालल्या मुळेच कायद्याचे उल्लंघन न करता सर्वांनी खूप सुंदर पणे आप आपल्या घरांमध्ये बाबासाहेबांची जयंती जोरदारपणे पण बाहेरच्या परिस्थिती चे भान ठेवून साजरी केली. त्यामुळे सर्वांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे …आज सर्व आंबेडकरी अनुयायांनी दाखवून दिले की आम्ही कायद्याच्या नुसत्या गप्पा नाही मारत तर तो पाळणे आमचे कर्तव्य समजतो। कारण कायदा आमच्या बापा ने च लिहिला आहे ना!
सर्वांनी लॉक डाउन चे नियम पाळून अनोखी अशी डिजिटल जयंती साजरी केल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन.अशीच वैचारिक एकता कायम ठेवा ह्याच सदिच्छा!असे उदगार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close