ताज्या घडामोडी

राज्यस्तरीय अॉनलाईन अभिनय स्पर्धा संपन्न*

*राज्यस्तरीय अॉनलाईन अभिनय स्पर्धा संपन्न*
*भारती धिंगान (प्रतिनिधी)* *नाशिक* सध्या देशात कोराना महामारी मुळे शासनाच्या वतिने लाॅकडाऊन जाहिर करण्यात आले…
या काळात हौशी कलक्षेत्रातील कलावंतांच्या कलेला वाव देण्यासाठी शिवांजली अपंग बहुउद्देशीय कल्याणकारी सेवाभावी संस्था व सागर आर्ट फ्लिम मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आॅनलाईन स्पर्धा घेण्यात येत आहे.
दिनांक 15एप्रिल 2021रोजी राज्यस्तरीय अॉनलाईन अभिनय स्पर्धा घेण्यात आल्या…या स्पर्धेत अनेक कलावंतांनी आपला सहभाग नोंदवून अपला अभिनय सादर केला…
या स्पर्धेचा निकाल दिनांक 20 एप्रिल 2021 रोजी जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत जळगावचा सौरभ वाणी याने पहिला क्रमांक पटकावला दुसरा क्रमांक नांदेडची वैष्णवी वाघमारे तर तिसरा क्रमांक चिपळुनचा आर्यण पाटील याने पटकवीला आहे…
परिक्षक म्हणून संस्थेचे अध्यक्ष लघुपट निर्माता दिग्दर्शक हिरामण मनोहर, संगितकार आनंद महिरे, कॅमेरामन नाना आहिरे यांनी बघीतले
येत्या 22 तारखेला पुन्हा राज्यस्तरीय अॉनलाईन नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती निर्माता दिग्दर्शक हिरामण मनोहर यांनी दिली आहे..

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close