आरोग्य व शिक्षण

संकटमोचन- भुजबळ साहेब

मुख्यसंपादक काझी सलीम ,येवला 9850140788

मुख्यसंपादक काझी सलीम ,येवला 9850140788

éमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070

सुंदर जोडी आमचे मित्र संजय आणि वहीणीसाहेब यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🌹

 

– All right are © reserved –

संकटमोचन- भुजबळ साहेब

– महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्हा हा लोकबनेते छगनरावजी भुजबळ साहेब यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो,जिल्ह्याने आजवर अनेक अनेक चढ उतार बघितले, भुजबळ साहेब यांच्या प्रचंड डेडिकेशन मुळे नावारूपाला आलेला हा जिल्हा त्यातच भर पडली ती Covid काळात साहेब यांच्या माध्यमातून होत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीची; भुजबळ कोवीड सेंटर राज्यातील अव्वल असलेले सुसज्ज कोवीड सेंटर आणि आता सुरू झाला कोवीड विरुद्ध भुजबळ हा नाशिक ला Covid मुक्त करण्याचा प्रवास.

– नाशिक जिल्हा साठी सदैव कार्यतत्पर असलेले साहेब,आपल्या पालकत्वाचा भूमिकेत कुठेही कमतरता ठेवत नसून,जिल्ह्याच्या जनतेच्या पालकत्वाचा वसा सेवेच्या माध्यमातून अखंड पने चालू ठेवत आहे.

– नाशिक जिल्ह्यातील कोवीड ची परिस्थिती लक्षात घेऊन साहेब यांनी कोवीड सेंटर उभे केले; त्यात मेडिकल स्टाफ तसेच अद्यावत सर्व सुविधा करून रूग्णांना ह्या परिस्थितीत मोठा हातभार दिला.

– जाणता राजा शरदचंद्रजी पवार साहेब यांनी ह्या कोवीड सेंटर बद्दल कौतुक केले,हे १८० ऑक्सीजन व ११५ CCC बेड चे कोवीड सेंटर भुजबळ नॉलेज सिटीने उभे केले; हे कोवीड सेंटर इतर संस्थांना प्रेरणादायी ठरेल असे पवार साहेब उद्घाटन प्रसंगी बोलले.

– कोरोनाच्या संकटात संकटग्रस्त रुग्णांच्या मदती साठी त्यांना आधार देणारे वैशिष्ट्य पूर्ण व नावीन्यपूर्ण असे ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ नॉलेज सिटी येथे उभे राहिले,साहेब यांनी हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा उपक्रम असून हे कोविड केअर सेंटर राज्यातील इतर संस्थाना कोरोनाच्या लढाईत काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.

– कोवीडचे मोठे संकट देशावर आणि राज्यवार असून यातून बाहेर पडण्यासाठी सर्व संस्था संघटनाची मदत आवश्यक असून त्यांनी यामध्ये पुढे येण्याची आवश्यकता आहे.

– मुबलक ऑक्सीजन व्यवस्था असलेले हे सेंटर आहे,कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना कोवीड हॉस्पिटल सारख्या सोई सुविधा देण्यात आल्या आहे; या ठिकाणी रुग्णांना औषध उपचारा सह दोन वेळचे पौष्टिक जेवण,अंडी आणि नाश्ता,फळांचा रस,चहा,रात्रीचे हळदयुक्त दुध,शुद्ध पिण्याचे पाणी इत्यादी सोयी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे; त्याच सोबत रुग्णांच्या विरंगुळ्या साठी वाचनालय व बुद्धिबळ,कॅरम इ.खेळ,कलाप्रेमीं साठी चित्रकलेची व्यवस्था यांसह करमणुकी साठी ३ मोठे स्क्रीन तसेच दोन दूरदर्शन संच आणि चार मोबाईल चार्जर युनिट यांसारख्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत,मोठ्या स्क्रीनवर सकाळी योगा व प्राणायामचे प्रशिक्षण देण्यात येईल,त्यानंतर मधुर संगीत, चित्रपट,सध्याच्या घडामोडी यासह सायंकाळी आय.पी.एल क्रिकेटच्या मॅचेस दाखविण्यात येणार आहेत,जेणे करून रुग्णांचे मनोरंजन होऊन त्यांचा मानसिक ताण कमी होईल तसेच आजाराची भीती दूर होण्यासाठी मदत होणार आहे.

– नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांची प्रचंड संख्या लक्षात घेता शहरातील हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध नाही, कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलचा ताण कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी या कोविड सेंटरचा पर्यायी व्यवस्था म्हणून उपयोग होणार आहे; येथील काही ७०% बेड पुरुषांसाठी तर ३०% बेड महिलां साठी राखीव ठेवण्यात आले आहे.

– एक महिना दुर्बल घटकांना मोफत अन्न धान्य देऊन लोकनेते भुजबळ साहेब यांनी, अन्न नागरी पुरवठा ह्या विभागाला एक विशिष्ठ उंची बहाल केली आहे, अन्न सुरक्षा योजनेतील ७ कोटी लाभार्थ्यांना प्रती महिना ३ किलो गहू,२ किलो तांदूळ १ महिन्या साठी मोफत दिले आहे; त्याचं बरोबर शिवभोजन थाळी मोफत देऊ केली आहे असे सर्व २ लाख थाळी नियोजन साहेब यांनी केले आहे.

✍️✍️
कमलेश पैठणकर

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close