आरोग्य व शिक्षणक्राईमताज्या घडामोडीराजकीय

पी,डी .वैद्य अँड सन्स च्या चेअरमन स्नेहलता वैद्य यांचे वयाच्या 76 वर्षी निधन

पी.डी . सन्स च्या चेअरमन स्नेहलता वैद्य यांचे वयाच्या 76 वर्षी निधन

आकुर्ले : विजय डेरवणकर

कर्जत दहिवली येथील सुप्रसिध्द उद्योजिका पी .डी . वैद्य अँड सन्स च्या चेअरमन स्नेहलता वैद्य यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झालं आहे तरी त्यांच्या जाण्याने सर्वत्र शोककाळा पसरली आहे

स्नेहलता वैद्य यांचा देदीप्यमान जिवन प्रवास

वैदय प्रोडक्टसची आयुर्वेदिक आवळा सुपारी
साता समुद्रापार पोहोचली
स्नेहलता पुरुषोत्तम वैद्य ( भरारी : गृहिणी ते उद्योजिका )
——————————-
जीवनात अनेक संघर्षाला सामोरे जाऊन लावलेले हे रोपटे आता मोठे वटवृक्ष झाले आहे . त्यात माझ्या मुलांचाही वाटा आहे . आजही तेवढ्याच उमेदीने या व्यवसायात देखरेख करीत होत्या कितीही संकटे आली तरी जीवनात पुढे चालत राहणे हेच माझे ब्रीद वाक्य होते . कामावे तो सामावे हा आदर्श जीवन मूल्य बाळगून जीवनाची वाटचाल सुरु होती

त्यांचा जन्म रत्नागिरीची जन्म 20 ऑगस्ट 1944 चा . सर्व शिक्षण माखजण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ येथे झाले . आई वडील ,दोन बहिणी, तीन भाऊ असे आमचे बाळशे कुटुंब . माझे वडील आयुर्वेदिक डॉक्टर होते . त्यामुळे लहानपणापासूनच या आयुर्वेदिक औषंधाची मला ओळख होती . लग्न 1963 मध्ये पुरुषोत्तम धोंडो वैद्य यांच्याशी झाले . आणि त्यानंतर मी महाड येथे सासरी आले . बघते तर काय माझ्या सासरी सुद्धा आयुर्वेदाचाच व्यवसाय होता . माझे सासरे धोंडो वासुदेव वैद्य हे मोठ्या प्रमाणात आयुर्वेदाचा व्यवसाय करत असत. माझ्या पतीचा आयुर्वेद औषध निर्मितीचा समर्थ औषधालय या नावाने व्यवसाय होता . 1972 मध्ये आम्ही मुंबई (गोवंडी )येथे राहायला गेलो .  मात्र काही कौटुंबिक कारणामुळे हा व्यवसाय सोडावा लागला . अशा परिस्थितीत मी व माझ्या पतीने हिमतीने घरातच आवळा सुपारी चा व्यवसाय करण्याचे ठरवले आणि कामास सुरवात केली . घर व तीन मुले सांभाळत हा व्यवसाय पूर्ण जोमाने सुरु ठेवला .1975 मध्ये घरासमोरील श्री नागेश इंडस्ट्रीयल इस्टेट मध्ये 200 फुटाचा गाळा भाड्याने घेऊन व्यवसाय वाढवला . तेव्हा किलो किलो ने वाढ होत गेली . कंपनीचे ,मालक श्री आचरेकर यांनी आमचे कष्ट काम तसेच आमचा कठीण काळ लक्षात घेऊन आमच्याकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले नाही .
व्यवसाय वाढल्याने अधिक जागेची गरज भासल्याने अखेर आम्ही 1978 मध्ये कर्जत दहिवली येथे आलो . आणि जागा घेऊन सहा खोल्यांची रूम बांधली . आणि याच जागेत आवळा सुपारी बनविण्याचा कारखाना टाकून व्यवसाय सुरु केला . मात्र त्यावेळी आमच्याकडे अत्याधुनिक मशिनरी नसल्याने सर्व काम  माझे पती हातानेच करीत . मी मुंबईला ऑफिस सांभाळायचे . 1984 मध्ये मुले पदवीधर होऊन या व्यवसायात आली . आणि त्यांच्या मदतीने हा व्यवसाय सर्वदूर पसरला . आवळा सुपारी महाराष्ट्रभर आणि त्या बाहेरही कर्नाटक ,तामिळनाडू आदी ठिकाणी विकली जाऊ लागली .
1989 मध्ये मुलगा महेश यांचे स्नेहाशी लग्न झाले .  तर माझा लहान मुलगा अविनाश याचे 1992 मध्ये लीना हिच्याशी लग्न झाले . त्यानंतर  आम्ही सर्वच वैद्य कुटुंब कर्जतला स्थायिक झालो .सुरवातीच्या काळात येथे फक्त दोनच घरे होती . हळहळू वस्ती वाढत गेली . या सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या विचाराने शिवाजी नगर या परिसराचे नामकरण केले . विशेष म्हणजे सर्व कर्जतकरानी आमच्यावर प्रेम करून आम्हाला उस्फुर्त प्रतिसाद दिला .

जशी मालाची मागणी वाढली ती पूर्ण करण्यासाठी नवनवीन मशीन घेतल्या . आणि मागण्या पूर्ण केल्या .यासाठी स्थानिक कामगार घेतले मात्र ते कामगार नसून जणू काही आमच्या कुटुंबाचे सदस्यच  आहेत असे त्यांचे आणि आमचे नाते  आहे . विशेष म्हणजे आमच्या सुपारीचा दर्जा व चव  आम्ही सलग 40 वर्षे टिकवून ठेवली . त्यामुळे आम्ही आमचे वेगळे स्थान निर्माण केले असून देशातच नाही तर वैद्य आवळा सुपारीचे नाव साता समुद्रापार गेले आहे .
—————

वैद्य आवळा सुपारीचे वैशीष्ट्य ….

आमच्या आवळा सुपारीमुळे अन्न पचनास मदत होते . चांगली भूक लागते . प्रवासात गाडीतून प्रवास करतांना होणाऱ्या मळमळ थांबविण्यासाठी उपयुक्त ठरते . विशेष म्हणजे विमानातून प्रवास करणारे सुद्धा फॉरेनर या वैद्य आवळा प्रोडक्टसची आवर्जून मागणी करतात .
———————

तसेच परवाना प्राप्त आयुर्वेद औषध उपलब्ध

पारंपरिक पद्धतीने या औषधांचा व्यवसाय , रुग्णांना अल्पदरात सेवा देतो . यामध्ये शक्तीसुधा , मधुसुधा , गॅस स्टोन आदी औषधांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते . त्यामधील मधुसुधा ( मधुमेहासाठी ) अधिक मागणी
————————–

पुरस्कार …

1. जागतिक महिला दीना निमित्त स्मिता तळवकर यांच्या हस्ते पुरस्कार

2. इनरव्हील क्लब तर्फे जिजामाता पुरस्कार

3 .कर्जत आयकॉन पुरस्कार

4. 2016 मध्ये कर्जत नगर परिषदेने औद्योगिक क्षेत्रात प्राविण्य मिळविण्याबद्दल मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या हस्ते पुरस्कार आदी .
————————————–

सामाजिक क्षेत्रातही योगदान ..

दहिवली येथील प्रसिद्ध विठ्ठल रखुमाईच्या पालखीचा मान गेली चौदा वर्ष सुरु आहे .

गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

गावोगाव हागणदारी मुक्त होण्यासाठी शौचालय उभारली
—————————-

कुटुंबही उच्च सुशिक्षित

महेश पुरुषोत्तम वैद्य – बी कॉम , माधवी वैद्य( जोशी ) – बीए ,अविनाश पु . वैद्य – बी कॉम , डॉ . निशात महेश वैद्य – एम डी मेडिसिन , डॉ . श्वेता वैद्य – स्त्री रोग तज्ञ , अँड . चंद्रकांत महेश वैद्य , डॉ . मुग्धा अविनाश वैद्य – एम डी  मेडिसिन शिकत आहे . जावई दत्तात्रय नारायण जोशी वकील हायकोर्ट , अँड .रोहित द . जोशी ,अँड निकिता जोशी , अँड . राधिका दत्तात्रय जोशी .
——————————

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close