ताज्या घडामोडी

नाशिक पंचवटीतील हिरावाडी परिसरातील तीन इमारती प्रतिबंधित क्षेत्र जाहीर*

*

नाशिक – ब्रम्हाणी पार्क येथे 29 करोनाबाधित आढळले आहेत. त्यातील साईगार्डन अपार्टमेंटच्या विंग्ज ए व बी आणि गोदावरी रो-हाऊस सील करण्यात आला आहे. या ठिकाणची पाहणी पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्त यांनी केली,त्याप्रसंगी नगरसेविका प्रियंका माने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय देवकर, सहायक पोलिस आयुक्त प्रदीप जाधव, पंचवटी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक भगत, स्वच्छता निरीक्षक संजय दराडे आदी उपस्थित होते.हिरावाडी रोडवरील ब्रम्हाणी पार्क येथे करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने या पार्कमधील तीन इमारती व एक रो-हाऊस 21 दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
या ठिकाणी बुधवारी सायंकाळी पोलीस आयुक्त दीपक पांडे व महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी येथील नागरिकांना सुरक्षेच्या सूचना दिल्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close