ताज्या घडामोडी

आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळेच्या पदभरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन* *: आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे*

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

*आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळेच्या पदभरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन*
*: आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे*

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

नाशिक दिनांक 6 एप्रिल 2021
आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी नवीन शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रात 14 एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल शाळा सुरू होणार आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्रात एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल शाळांमध्ये एकूण 216 जागांसाठी पदभरती होणार असून याकरिता 30 एप्रिल 2021 पर्यंत आवेदनपत्र सादर करण्याचे आवाहन आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डच्या २५ शाळांमध्ये इयत्ता ६ वी ते १२ वी च्या वर्गात साधारण ६००० पेक्षा अधिक अनुसूचित जमातीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केंद्राकडून महाराष्ट्रात या एकलव्य मॉडेल रेसिडेंशीयल शाळेमध्ये प्राचार्य (१६), उप-प्राचार्य (०८), टी.जी.टी. (इंग्रजी, फिजिक्स, गणित, अर्थशास्त्र, बायोलॉजी, कॉमर्स) (२८) आणि पी.जी.टी (इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र) (१६४) अशा एकूण २१६ जागांसाठी पदभरती होणार आहे. या पदांसाठी ३० एप्रिल २०२१ पर्यंत https://recruitment.nta.nic.in/WebinfoEMRSRecruitment या संकेतस्थळावर अधिकाधिक व्यक्तींनी आवेदनपत्र सादर करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी काम करावे, असे आदिवासी विकास आयुक्त श्री. सोनवणे यांनी कळविले आहे.

पदभरती करीता होणारी परीक्षा ही तीन तासांची असून ही परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जून २०२१ या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. तसेच सदरची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेत संगणकावर घेण्यात येईल, असे देखील आदिवासी विकास आयुक्त श्री. सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून कळविले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close