कृषी

सोशल वर जाहिरात,दोनच दिवसात २२ क्विंटल गहू विक्री.. प्रयोगशील शेतकरी…उत्तम पुणे.

सोशल वर जाहिरात,दोनच दिवसात २२ क्विंटल गहू विक्री..

प्रयोगशील शेतकरी…उत्तम पुणे.

कोपरगाव तालुक्यातील, ब्राम्हणगावं येथील प्रयोगशील शेतकरी उत्तम पुणे यांनी २०२०/२१ रब्बीत २ एकर वर ४९६ व्हरायटी चा गहू प्रेरणी केली होती.
अवकाळी पाऊस,उशिरा पेरणी तरीही तुषार सिंचन वर ४ व नंतरचे २ पाणी प्रवाही सिंचनाने देऊन कुठलेही तन नाशक,पोषक,किड नाशक, बुरशी नाशक फवारणी न करता नैसर्गिक पद्धतीने उत्पादन घेतले.बियाणे देखील घरचेच पेरले.
त्यात त्यांना २२ क्विंटल उत्पादन मिळाले.गहूं कापणी पूर्वी त्यांनी कृषी क्रांती ॲप वर जाहिरात दिली.त्यानंतर तयार झाल्यावर गहू फोटो सह ,२२ रुपये किलो दर अशी जाहिरात तयार करून मोबाईल वर विविध ग्रुप वर टाकली.
त्यामुळे दोनच दिवसात त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला.ग्राहकाचे मागणी नुसार त्यांनी गहू क्लीन करून,तीन प्रतीत ग्रेडिंग करून ३० किलो व ५० किलो पॅकिंग केले.नंबर एक प्रतीचा गहू २२०० रू.क्विंटल प्रमाणे विकला.
ग्राहकांनी घरी येऊन गहू नेल्याने वाहतूक खर्चात बचत झाली.ग्राहकांना ही फवारणी विरहित, विषमुक्त गहू मिळाला.कुठलीही घासागिस न करता त्यांनी खरेदी केली .बाजार पेठेत १६ ते १७ रुपये किलो भाव असताना,शेतकरी ते ग्राहक विक्री केल्याने क्विंटल मागे ५०० रुपये अधिक मिळाले.
शिवाय मागील वर्षी व या वर्षी मार्च अखेर मुळे मार्केट बंद तसेच कोरोना संकट यावर मात वेळी गहू विकून उत्पन्न साध्य केले.गेल्या वर्षी याच २ एकरात रासायनिक फवारणी करून ३५ क्विंटल उत्पादन मिळाले होते.नैसर्गिक रीत्या पिक घेतल्याने सांगितलेली किंमत मिळाल्याने निव्वळ उत्पंनात फारसा फरक पडलेला नाही.
यानंतर ग्राहकांची गरज ओळखून हरभरा देखील १ किलो,२किलो,५ किलो ची पॅकिंग करून विक्री करण्याचे त्यांनी ठरवले आहे.इतरच शेतकऱ्यांनी केवळ पिकवण्या पेक्षा आपल्या उत्पादित माल.. क्लीन करून,ग्रेडिंग ,पॅकिंग करून शेतकरी ते ग्राहक विक्री केल्यास निश्चित दोन पैसे मिळतात. असे त्यांनी शेवटी सांगितले.

*शेतकरी*..उत्तम बादशहा पुणे.
बी.कॉम. एम्. ए.(अर्थशास्त्र)
मोबा.९९२२८२७६१३
मी.पो….ब्राम्हण गावं
तालुका..कोपरगाव
जिल्हा..अहमदनगर
दिनाक…६/४/२०२१

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close